Karavali festival News, Goa Festival News  Dainik Gomantak
गोवा

शिरोलीत ‘करवली’ उत्सव उत्साहात

घरोघरी पूजन: रोंबाट आणि जाणकारांचे गायन

दैनिक गोमन्तक

पर्ये: शिरोली, केरी-सत्तरी येथे शिगमोत्सवाला प्रारंभ झाला असून सर्वदूर प्रसिद्ध असलेला दोन दिवशीय ‘करवली’ उत्सव उत्साहात पार पाडला.शिरोलीच्या शिगमोत्सवाची सुरुवात होळी पौर्णिमेच्‍या दिवशी संध्याकाळी राखण्याची होळी व मुख्य होळी तोडून होते. दुसऱ्या दिवशी सकाळी होळी गावातील देवळाकडे आणून आंब्याच्या पानांनी सजवून तिची पूजा केली जाते. त्यानंतर ढोलताशांच्या गजरात होळी उभारण्यात येते व विविध धार्मिक विधी झाल्यानंतर होळीवर नारळ फोडले जातात. याच दिवशी संध्याकाळी ‘चोरोत्सव’ साजरा होतो. त्यानंतर तिसऱ्या व चौथ्या दिवशी ‘करवली उत्सव’ होतो. (Goa Festival News Updates)

असे असते उत्‍सवाचे स्‍वरूप

देवीच्या दोन करवली (लहान मुले स्त्री वेशात) संपूर्ण गावात घरोघरी जातात. प्रत्येक घरी करवल्यांची पूजा करून ओटी भरली जाते. यावेळी रोंबाट नाचवले जाते व जाणकारांकडून गायन केले जाते. शिरोली गाव करवली उत्सवासाठी प्रसिद्ध असून येथील कलाकार मोठ्या उत्साहात सकारती गायन करतात. यंदाही सकारती गायन करण्यात आले. शिरोलीतील करवली उत्सवाला केरी, घोटेली आणि पंचक्रोशीतील नागरिक तसेच लोककला अभ्यासक उपस्थिती लावतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

Colvale Central Jail Security: कोलवाळ कारागृहात सध्या चाललेय काय? सुरक्षेचा फज्जा, गुन्हेगारी नेटवर्क जोमाने कार्यरत

Pakistan Youth Protest: पाकिस्तानी गृहमंत्र्यांना 'कॉकरोच' आंदोलनाची भीती, शाहबाज सरकारला दिला घरचा आहेर; तरुणांच्या संतापाकडे वेधले लक्ष

Goa Stray Dogs: भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर हायकोर्टाची दखल; राज्य सरकारसह स्थानिक स्वराज्य संस्थांना नोटीस

Bail Surety Fine: चुकीचा मोबाईल नंबर देत कोर्टाची दिशाभूल, महिला जामीनदाराला पडलं महागात; 10 हजारांचा ठोठावण्यात आला दंड

SCROLL FOR NEXT