Kurti - Ponda waterway burst  Dainik Gomantak
गोवा

कुर्टी - फोंड्यातील जलवाहिनी फोडली!

ऐन होळीत पाण्यासाठी धावपळ: ‘एसटीपी’ प्रकल्पाच्या नावाखाली अनागोंदी

दैनिक गोमन्तक

फोंडा: फोंडा तसेच कुर्टी भागात मलनिस्सारण एसटीपी प्रकल्प कामाची अनागोंदी चालली असून कुर्टी भागातील हाऊसिंग बोर्ड कॉलनीत तर या अनागोंदीमुळे येथील रहिवासी मेटाकुटीला आले आहेत. या कामात कोणतेच सातत्य नाही, उलट मिळेल तेथे खड्डे खोदून ठेवणे, विलंबाने हे खड्डे बुजवणे, सगळीकडे धुळीचे साम्राज्य, मातीचे ढिगारे असा प्रकार असून काल (गुरुवारी) मातीचे ढिगारे काढताना जलवाहिनी फोडून टाकल्याने कुर्टी भागात काही लोकांना ऐन होळीला पाण्यासाठी धावपळ करावी लागली.

फोंडा मतदारसंघात मलनिस्सारण प्रकल्पाचे काम गेल्या सहा वर्षांपेक्षा जास्त काळ रखडले असून काही ठिकाणी अजूनही खड्डे खोदण्यात येत आहेत. हे खोदलेले खड्डे वेळेत बुजवले जात नाहीत. खड्डे खोदण्यासाठी रस्ते बंद करण्यात येतात, त्यामुळे स्थानिकांना वाहने नेता येत नसल्याने अतिशय अडचण होते. खड्डे विलंबाने बुजवण्यात येत असले तरी सगळीकडे धुळीचे साम्राज्य पसरलेले असते. यावर सरकारी खात्याचे कोणतेच नियंत्रण नाही. धुळीमुळे स्थानिकांना सर्दी खोकल्याचा त्रास होत असून सरकारी यंत्रणेचे कोणतेच नियंत्रण नसल्याने लोकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. कंत्राटदाराच्या लोकांकडून मनमानी चालली असून सरकारी नियंत्रण नसल्याने स्थानिकांना अतिशय मनस्ताप सहन करावा लागतो, अशी माहितीही कुर्टीवासीयांनी दिली.

जलवाहिन्या फोडण्याचे प्रकार

मलनिस्सारण प्रकल्पासाठी खड्डे खोदण्यात कोणतेच नियोजन नाही. भर रस्त्यावर खोदलेले खड्डे बराच काळ तसेच ठेवले जातात. यासंबंधी येथील नागरिकांनी संबंधित कंत्राटदाराचे कामगार व पर्यवेक्षक तसेच सरकारी अधिकाऱ्यांना जाब विचारला तर सारवासारव केली जाते. सरकारचे कोणतेच नियंत्रण नसल्यामुळेच हा प्रकार होत असून लोकांना नाहक मनस्ताप का असा सवाल नागरिकांनी केला आहे.

कामाच्या नावाखाली एसटीपी कामगारांकडून जलवाहिन्या फोडण्याचे प्रकार सुरू आहेत. फोडलेल्या जलवाहिन्या वेळेत दुरुस्त केल्या जात नसल्याने स्थानिकांना अधिकच त्रासदायक ठरले आहे. कुर्टीतील नवीन हाऊसिंग बोर्ड कॉलनीतील क्रिस्टल संकुलाजवळ असलेली एक जलवाहिनी एसटीपी कामगाराने जेसीबी यंत्र घालून मातीचा भराव काढताना फोडली, पण ही जलवाहिनी वेळेत दुरुस्त न केल्याने ऐन होळी उत्सवात येथील लोकांना पाण्यासाठी धावपळ करावी लागली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT