तृणमुल काँग्रेसचे नेते लवू मामलेदार यांनी तेलंग पंचवाडकर यांना तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश दिला. Dainik Gomantak
गोवा

गोव्यात तृणमूल काँग्रेस पक्ष हाच भाजपला पर्याय

गोव्यात तृणमूल काँग्रेस पक्ष (Trinamool Congress) आला असून गोमंतकीय जनतेने या पक्षाला साथ द्यावी, असे आवाहन माजी आमदार तथा तृणमूल काँग्रेसचे नेते लवू मामलेदार यांनी पेडणे येथे केले.

दैनिक गोमन्तक

पेडणे : गोव्यातील (Goa) जनता भाजप सरकारला (BJP Government) कंटाळली असून महागाईने त्रस्त झालेले लोक येत्या निवडणुकीत बदल घडवून आणणार आहेत. भाजपला सक्षम पर्याय म्हणून गोव्यात तृणमूल काँग्रेस पक्ष (Trinamool Congress) आला असून गोमंतकीय जनतेने या पक्षाला साथ द्यावी, असे आवाहन माजी आमदार तथा तृणमूल काँग्रेसचे नेते लवू मामलेदार यांनी पेडणे येथे केले. पेडणे येथे काँग्रेसचे कार्यकर्ते तेलंग पंचवाडकर (Telang Panchwadkar) यांच्या तृणमूल काँग्रेस पक्ष प्रवेश कार्यक्रमात मामलेदार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर साहित्यिक तथा तृणमूलचे नेते एन. शिवदास, संतोष मांद्रेकर, सूरज गरड उपस्थित होते. यावेळी मामलेदार म्हणाले, की पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींनी भाजपला धडा शिकवला असून अनेक अडचणींवर मात करत त्यांनी पश्चिम बंगालमध्ये परत एकदा सत्तास्थान प्राप्त केले आहे.

देशात भाजपला पर्याय लोक शोधत होते. तृणमूल काँग्रेसच्या रूपाने लोकांना पर्याय मिळाला आहे. यावेळी एन. शिवदास म्हणाले, मतदारांना निवडणुकीच्या तोंडावर खोटी आश्वासने दाखवण्याचे काम भाजप सरकार करत आहे. महिन्याला दोन हजार रुपये बेकारी भत्ता मिळणार, अशी आमिषे दाखवून लोकांची मते मागितली जात आहेत. प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख रुपये येणार अशी आश्वासने दिली. मात्र पैसे आलेच नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT