Goa: राज्यपालांकडून अनाथालये व डायलिसीस रुग्णांना मोठी आर्थिक मदत Dainik Gomantak
गोवा

Goa: राज्यपालांकडून अनाथालये व डायलिसीस रुग्णांना मोठी आर्थिक मदत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 71 व्या वाढदिनानिमित्त राज्यपालांकडून अनाथलये तसेच डायलिसीस रुग्णांसाठी आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली आहे

दैनिक गोमन्तक

पणजी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 71 व्या वाढदिनानिमित्त राज्यपालांकडून अनाथलये तसेच डायलिसीस रुग्णांसाठी आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली आहे. त्यांनी पंतप्रधान मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

राज्यपालांनी यावेळी राज्यातील 71 वृद्धाश्रम, अनाथालये आणि अशा इतर संस्थांना आर्थिक मदत जाहीर केली. त्यांनी 71 व्यक्तींना राजभवनातून डायलिसीस उपचारांसाठी राज्यपालांच्या डिस्क्रेशनर निधीतून ही आर्थिक मदत घोषित केली आहे. इच्छुक व्यक्ती तसेच संस्थांनी सर्व वैयक्तिक तपशील तसेच संस्थेच्या उपक्रमासंदर्भातच्या माहितीसह अर्ज करावा. डायलिसीस उपचारांच्या बाबतीत ज्या रुग्णावर उपचार सुरू आहेत त्या रुग्णालयांचा उल्लेख करावा. अर्ज राज्यपालांच्या सचिवांच्या नावे 30 सप्टेंबर 2021 पूर्वी सादर करावे. प्रथम येणाऱ्यास प्रथम तत्त्वावर आर्थिक सहाय्य मंजूर केले जाईल, असे राजभवनमार्फत प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

राष्ट्रसेवेसाठी आणि लोककल्याणासाठी समर्पित असा नेता लाभल्याने देश धन्य झाला आहे. त्यांनी कोविड 19 महामारीच्या काळात उत्तम व्यवस्थापनासाठी आणि आत्मनिर्भर भारत' या संपूर्ण विकसित भारताच्या कल्पनेसाठी पंतप्रधानांचे राज्यपालांनी पत्रकातून कौतुक केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT