In Goa|Jaspal Singh Dainik Gomantak
गोवा

'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय', प्रत्येक शनिवारी पोलीस उपअधीक्षक ड्युटीवर

पोलिसांच्या विरोधात जरी तक्रार असेल तर त्यावरही कारवाई केली जाईल; जसपाल सिंग

दैनिक गोमन्तक

मडगाव : नागरिकांच्या तक्रारी थेट ऐकून घेण्यासाठी गोवा पोलिसांनी 'समाधान' ही योजना चालू केली असून या योजने अंतर्गत प्रत्येक शनिवारी पोलीस उपमुख्यालयाचा उपअधीक्षक आपल्या कार्यालयात बसून लोकांच्या तक्रारी थेट हाताळणार आहे. (In Goa now the Deputy Superintendent of Police is on duty every Saturday Jaspal Singh)

पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांनी आज मडगावात नागरिकांबरोबर घेतलेल्या बैठकीत याचे सूतोवाच केले. नागरिकांची कुठलीही अडचण असो उपअधीक्षक त्या थेट ऐकून घेतील आणि शक्यतो तिथल्या तिथे ती समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतील असे सिंग यांनी सांगितले.

नागरिकांनी कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता आपली तक्रार नोंदवावी. अगदी पोलिसांच्या विरोधात जरी तक्रार असेल तर त्यावरही कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले.

आज जसपाल सिंग यांनी सर्व धर्माच्या नेत्यांशी संवाद साधत राज्यात कुठल्याही प्रकारचा धार्मिक तणाव होणार नाही यासाठी लोकांनी पोलिसांना सहकार्य करावे अशी विनंती केली. सिंग हे 2001 साली दक्षिण गोव्याचे अधीक्षक होते. त्याची आठवण काढत त्यांनी यासाठीच आपण नागरिकांबरोबरची पहिली बैठक माडगावात घेतली असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT