Amit Patkar Dainik Gomantak
गोवा

लोकसभेच्या दोन्ही जागांवर काँग्रेसचं लक्ष, भाजप विरोधी जनतेत खदखद

दक्षिण गोवा जिल्हा समितीचा ताबा सवियो फेर्नांडिस यांच्याकडे सुपूर्द

दैनिक गोमन्तक

मडगाव : भाजपच्या विरोधात अजूनही लोकांच्या मनात असंतोष आहे. विधानसभा निवडणुकीत 67 टक्के लोकांनी भाजपला नाकारले ही वस्तुस्थिती आहे. भाजप च्या विरोधात लोकांमध्ये जो राग खदखद आहे त्याची जाणीव सध्या काँग्रेस पक्षाने हाती घेतलेल्या चेतना यात्रेतून दिसून येत असल्याचे मत काँग्रेस प्रदेश समितीचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी व्यक्त केले.

आज पाटकर यांनी प्रदेश समितीचे कार्याध्यक्ष युरी आलेमाव यांच्या उपस्थितीत दक्षिण गोवा जिल्हा कार्यकारीणीचा अधिकृतपणे दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्ष सवियो डिसिल्वा यांच्याकडे दिला. यावेळी मडगावच्या जिल्हा कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात बोलताना 2024 साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही जागांवर काँग्रेस उमेदवार निवडून आणणे हे आमचे लक्ष्य असून जुन्या कार्यकर्त्यांचा अनुभव आणी युवा कार्यकर्त्यांची शक्ती या जोरावर आम्ही हे लक्ष्य सहज साध्य करू असे ते म्हणाले.

यावेळी बोलताना सवियो डिसिल्वा यांनी, काँग्रेस पक्षाला गोव्यात अजुनही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चेतना यात्रातून दिसून येत असून काँग्रेस पक्षला राज्यात पुन्हा पुनरवैभव मिळतील याचे हे संकेत असल्याचे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: किंग कोब्राला चक्क किस करण्याचा प्रयत्न; पुढच्या क्षणी जे झालं ते पाहून लोकांची धाकधूक वाढली, पाहा व्हायरल व्हिडिओ

Election Commission: केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कारवाईला आम्ही कंटाळलो! 'गोवा काँग्रेस पक्ष' नोंदणी प्रक्रियेसंदर्भात कोर्ट नाराज

VIDEO: वकिलाची गाडी अडवून मारहाण अन् शिवीगाळ, आमदार पुत्राची गुंडगिरी; तक्रारीनंतरही FIR नाही, पोलिसांच्या भूमिकेवर सवाल!

Myanmar Airstrike: म्यानमारमध्ये मृत्यूचं भयानक तांडव! गजबजलेल्या बाजारात अचानक हवाई हल्ला; 49 जणांचा मृत्यू; 58 जखमी, थरारक VIDEO समोर

Horoscope: संकष्टी चतुर्थीला जुळून आलाय अत्यंत दुर्मिळ शुभ योग! बाप्पाच्या आशीर्वादाने 'या' 5 राशींचे उघडणार नशिबाचे दरवाजे, नोकरी-व्यवसायात प्रगतीचे संकेत

SCROLL FOR NEXT