Davorlim Dainik Gomantak
गोवा

Davorlim: दवर्ली पंचायतीत सरपंच-नागरिकांत बाचाबाची, बांधकामाच्या एनओसीवरून उफाळला वाद

यापूर्वी दवर्ली पंचायत क्षेत्रात बेकायदेशीररीत्या बांधण्यात आलेल्या घरांचं प्रकरण बराच गाजलं होतं.

गोमन्तक डिजिटल टीम

दवर्ली ग्रामपंचायत क्षेत्रात एका बांधकामाला दिलेल्या एनओसीमुळे नागरिक आणि सरपंच यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाल्याची घटना नुकतीच घडलीय. दवर्ली पंचायतीच्या ग्रामसभेत हा वाद उफाळून आल्याची प्राथमिक माहिती मिळालीय.

पेट्रोल पंपला देण्यात येत असलेल्या परवानगीवरुन आज दवर्ली दिकरपाली पंचायतीच्या ग्रामसभेत प्रचंड गदारोळ झाला. पंपाला परवानगी देण्यास विरोध वाढल्याने संरपंच हेर्कुलान नियासो संतापले आणि थेट विरोधकांच्या अंगावर धावले. त्यामुळे ग्रामसभेत काही काळ तणावग्रस्त वातावरण होते. अखेर काही कालावधीनंतर वातावरण शांत झाले.

ग्रामसभेची सुरवात शांतपणे झाली. लोकांच्या मुलभूत प्रश्नांवर चर्चा झाली. खर्चाचे अंदाजपत्रकही संमत करण्यात आले. त्यानंतर पंचायतीतील पाच सदस्य श्याम राजाध्यक्ष, संतोष नाईक, विद्याधर आर्लेकर, संपदा नाईक व कार्मिनो कार्वाल्हो हे खाली ग्रामस्थांमध्ये जाऊन बसले. तेव्हा पंचायत क्षेत्रात पेट्रोल पंपला परवानगी देण्याचा विषय निघाला. खाली बसलेल्या पंचांनी व ग्रामस्थांनी या पेट्रोलपंपला परवानगी देऊ नये, असा सूर लावून धरला.

ज्या जागेवर हा पेट्रोल पंप प्रस्तावित आहे, ती जागाच बेकायदेशीर आहे. पेट्रोल पंपसाठी कायदेशीर तसेच सरकारी मान्यता कागदपत्रे लागतात ती नाहीत असे सर्वांनी सरपंचांना सांगितले. तेव्हा सरपंचांचा रागाचा पारा चढला.

त्यातच मनोज दुकळे नामक ग्रामस्थाने हा पेट्रोल पंप बेकायदेशीर कसा, याची कागदपत्रेच सादर केली तेव्हा मात्र सरपंच उठले व त्यांच्या अंगावर धावून गेले. तेव्हा इतरांनी त्याला अडविले, नाही नाही म्हणता हे प्रकरण हातघाईवर आले. या ग्रामपंचायतीत एकूण 11 पंच आहेत, त्यातील सहा जाणांचे बहुमत आहे.


ज्या जागेवर हा पेट्रोल पंप प्रस्तावित आहे, ती जागाच बेकायदेशीर आहे. पेट्रोल पंपसाठी कायदेशीर तसेच सरकारी मान्यता कागदपत्रे लागतात ती नाहीत असे सर्वांनी सरपंचांना सांगितले. तेव्हा सरपंचांचा रागाचा पारा चढला. त्यातच मनोज दुकळे नामक ग्रामस्थाने हा पेट्रोल पंप बेकायदेशीर कसा, याची कागदपत्रेच सादर केली तेव्हा मात्र सरपंच उठले व त्यांच्या अंगावर धावून गेले. तेव्हा इतरांनी त्याला अडविले, नाही नाही म्हणता हे प्रकरण हातघाईवर आले. या ग्रामपंचायतीत एकूण ११ पंच आहेत, त्यातील सहा जाणांचे बहुमत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT