Calangute Crime Dainik Gomantak
गोवा

Calangute Crime News: जेवणाच्या ऑर्डर वरून कर्मचाऱ्यांना मारहाण

सर्व आरोपींचा त्वरीत शोध घेऊन कळंगुट पोलीस ठाण्यात आणण्यात आले

गोमन्तक डिजिटल टीम

कलंगुट बार्देझ येथील कॅप्टन केबिन शॅक मध्ये जेवणाच्या ऑर्डर वरून झालेल्या किरकोळ वादातून शॅक कर्मचाऱ्यांना मारहाण केल्यापरकरणी आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींनी फिर्यादीला मारहाण करून घटनास्थळावरून पलायन केले होते. या मारहाणी विषयी अजय सेठी यांनी पोलिसात तक्रार दिली होती.

त्यानुसार सर्व आरोपींचा त्वरीत शोध घेऊन कळंगुट पोलीस ठाण्यात आणण्यात आले आणि दहा संशयित व्यक्तींपैकी नऊ जण अल्पवयीन असल्याचे उघड झाले. त्यामुळे सर्व नऊ अल्पवयीन मुलांना CWC यांच्यासमोर हजर करण्यात आले. सर्वांची ‘अपना घर’मध्ये रवानगी करण्यात आली. मात्र, नंतर अल्पवयीनांना प्रत्येकी १० हजार रुपयांच्या हमीपत्रावर सोडण्यात आले. या प्रकरणी प्रमुख आरोपी राज राम गुजराती याला अटक करण्यात आली आहे.आरोपीकडून हल्ल्याचे हत्यार म्हणजे दोन पोर डस्टर जप्त करण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

तिसऱ्या अपत्याला 30 हजार तर चौथ्याला 40 हजार, आंध्र प्रदेश सरकारची अनोखी स्कीम; मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा VIDEO

Rahu Gochar: नक्षत्र बदलून राहू करणार 3 राशींना मालामाल; मनासारखी नवीन नोकरी आणि मोठ्या पॅकेजची मिळणार ऑफर

Team India: क्रीडा जगतात मोठी खळबळ! टीम इंडियाच्या प्रशिक्षकावर लैंगिक शोषणाचा आरोप, थेट हकालपट्टीची कारवाई

Goa Dairy Subsidy: दूध उत्पादक आक्रमक! मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा रस्त्यावर उतरू; उत्तर गोवा शेतकरी संघटनेचा सरकारला थेट इशारा

Middle East War: एलपीजी, पेट्रोल अन् डिझेल आणखी महाग होणार? ट्रम्प-नेतान्याहूकडून मोठ्या हल्ल्याची तयारी; 'टार्गेट लिस्ट' बनवली

SCROLL FOR NEXT