Mapusa Police Station Faulty Vehicles  Dainik Gomantak
गोवा

Mapusa Police Station: नादुरुस्‍त वाहनांमुळे म्‍हापशात डोकेदुखी

Mapusa News: डासांची पैदास, रोगराई वाढण्याची भीती; पोलिस स्‍थानक बनलेय माहेरघर

गोमन्तक डिजिटल टीम

उत्तर गोव्यातील सर्वांत महत्त्‍वपूर्ण पोलिस स्‍थानक म्‍हणजे म्‍हापसा पोलिस स्‍थानक. विशेष म्‍हणजे या पोलिसस्‍थानकाच्‍या परिसरात अशी जप्‍त केलेली अनेक नादुरुस्‍त वाहने गेल्‍या अनेक वर्षांपासून पडून आहेत, ज्‍यामुळे डोकेदुखी वाढली आहे.

ही वाहने गंजत पडली असून सरपटणाऱ्या प्राण्‍यांसाठी ती आश्रयस्‍थान ठरत आहेत. शिवाय डासांच्‍या पैदासीला कारणीभूत ठरत आहेत. त्‍यामुळे या वाहनांची तातडीने विल्‍हेवाट लावावी, अशी मागणी केली जात आहे.

म्हापसा पोलिस स्थानकावर दिवसाकाठी मोठ्या संख्‍येने अपघातग्रस्‍त वाहने आणली जातात आणि ती नंतर वर्षोनुवर्षे तशीच पडून असतात. अशी वाहने ठेवायला जागासुद्धा अपुरी पडते. दुसरी गोष्‍ट म्‍हणजे दररोज येणारे लोकही आपली वाहने घेऊन येतात. त्‍यामुळे वाहनांची गर्दी होते.

अपघातात सापडलेली वाहने आहेत तशीच वाहनचालकांनी दंड न भरल्याच्या कारणास्तव आणून ठेवलेली वाहनेही आहेत. त्यामुळे ही अनेक वर्षांची वाहने गंजत पडली आहेत. पोलिस स्थानकाच्या मागच्या बाजूला तर मोठ्या प्रमाणात वाहने उभी करून ठेवण्यात आलेली आहेत. या स्थानकातच पोलिस व वाहतून पोलिस गुप्तचर कार्यालय आहे. येथील अधिकारी, त्यांचे इतर सहकारी आपली दुचाकी, चारचाकी वाहने घेऊन येतात.

निखिल पालेकर, पोलिस निरीक्षक (म्‍हापसा)

ही वाहने अपघातात सापडलेली तसेच दंड न भरल्याने जप्‍त करण्‍यात आलेली आहेत. वाहनचालकांना अनेक वेळा आपली वाहने नेण्यास सांगितले जाते, तरीसुद्धा ती नेली जात नाहीत. ही वाहने इतरत्र कुठे नेऊन ठेवायची म्हटल्यास आमच्याकडे जागा नाही. आता योग्य वेळी या वाहनांचा लिलाव केला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची लागणार लॉटरी? मूळ वेतनात 400 टक्क्यांपर्यंत वाढीचा फॉर्म्युला; रेल्वे संघटनेच्या प्रस्तावाने उडवली खळबळ

Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन 150 वर्षे जिवंत राहणार? रशियन शास्त्रज्ञांच्या दाव्यानं जगभरात खळबळ; प्रयोगशाळेत तयार केले जातायेत मानवी अवयव

घर सुटलं, देश सुटला अन् आता आयुष्यही संपलं! पाकिस्तानातून मायदेशी परतणाऱ्या अफगाण निर्वासितांचा ट्रक उलटला; 18 मृत्यू, 35 जखमी

पूजेसाठी निघाले, पण वाटेतच काळाने गाठले! मध्य प्रदेशात भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली दरीत उलटली; 6 जणांचा मृत्यू, 40 जखमी

Priti Yog 2026: वादविवाद संपणार, बँक बॅलन्स वाढणार! 3 राशींची लॉटरी लागणार; 8 जूनपासून सुरु होतोय अत्यंत दुर्मिळ 'प्रीति योग'

SCROLL FOR NEXT