School  Dainik Gomantak
गोवा

Education Department: पालकांसाठी महत्वाची बातमी; सरकार रेनकोटसाठीचे पैसे आता...

शिक्षण खात्याची तयारी पूर्ण : राष्ट्रीयीकृत बँकांमधील खात्यांना प्राधान्य

गोमन्तक डिजिटल टीम

Education Department पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना यावर्षी वेळेत पुस्तके मिळावीत म्हणून शिक्षण खात्याने तयारी चालवली आहे. दुसरीकडे पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांना रेनकोट व गणवेश न देता त्याची रक्कमच थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याची तयारी पूर्ण केली असल्याची माहिती शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी `गोमन्तक''ला दिली.

यंदा 6 जूनपासून नव्या शैक्षणिक वर्षास प्रारंभ होणार आहे. राज्य सरकारच्या वतीने सरकारी प्राथमिक शाळांमधील पहिली व तिसरीच्या विद्यार्थ्यांना रेनकोट दिले जातात.

यावर्षीही सरकारने रेनकोट देण्याची तयारी केली होती. त्यानुसार निविदा प्रक्रियाही पार पडली. पाच कंत्राटदारांनी निविदा भरली. परंतु तेवढे रेनकोट तयार करण्यासाठी एक महिन्याचा अवधी लागू शकतो, असे कंत्राटदारांनी खात्याला सांगितले.

त्यामुळे सरकारने कंत्राट देण्यापेक्षा रेनकोट पालकांनीच खरेदी करावा, त्यासाठीची रक्कम देण्याचा शिक्षण खात्याने निर्णय घेतला आहे.

त्याशिवाय मुलांच्या गणवेशाची रक्कमही मुलांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे. त्यात कापड आणि शिलाईची रक्कम असणार आहे. परंतु ही रक्कम किती द्यायची हे अद्याप निश्‍चित झालेले नाही.

रेनकोटचीही किती रक्कम द्यायची हेही निश्‍चित केलेले नाही. कोरोना काळात आणलेले कापड शिल्लक होते, म्हणून ते यापूर्वी दिले होते. आता पालकांनाच गणवेशाची रक्कम दिली जाणार असल्याचे झिंगडे म्हणाले.

तीन हजार मुलांची रक्कम पडून

गतवर्षी 12 हजार मुलांकडून बँक खाते क्रमांक आले होते. त्यातील 3 हजार लाभार्थींची रक्कम पडून आहे. काहीजणांची सहकारी बँकांमध्ये खाती आहेत. ज्यांनी खाते क्रमांक दिले आहेत, त्यात गफलती आढळल्या आहेत.

शिवाय काही पालक स्थलांतरित झाल्याने त्यांचे खाते क्रमांक नव्हते. त्यामुळे ती रक्कम खात्यावर गेलीच नाही. पहिलीत प्रवेश घेणाऱ्या मुलांच्या पालकांना राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये खाते उघडण्याची विनंती संचालकांनी केली आहे.

गतवर्षी पुस्तकांचा घोळ झाला होता. त्यामुळे यंदा छपाई करणाऱ्या कंत्राटदारास वेळेचे बंधन पाळण्याची सक्ती केली आहे. त्यामुळे यावर्षी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची पुस्तके ३० मेपर्यंत मिळतील, अशी आशा आहे. जरी काही विद्यार्थ्यांना पुस्तके मिळाली नाही, तर ती ऑनलाईनवर उपलब्ध आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT