Fishermen in Sal River Dainik Gomantak
गोवा

...त्यामुळे मच्छिमारांच्या उपजिविकेवर होणार परिणाम?

साळ नदीतील गाळ उत्खनन कामाची पाहणी

दैनिक गोमन्तक

सासष्टी : सद्या साळ नदीतील गाळ उपसण्यासाठी उत्खननाचे काम सुरु आहे. मात्र उत्खनन केल्यावर जो गाळ, कचरा एकत्र झाला तो साळ नदीतील बेटावर टाकण्यात आला आहे. त्यामुळे गोवा राज्य किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन अधिकारीणीच्या प्रतिनिधींनी या बेटाची पाहणी केली. तेथे गाळ, कचरा टाकल्याने पर्यावरणाला (environment) धोका निर्माण झाला आहे का? याचा अभ्यास हे प्रतिनिधी करत आहेत.

गोवा (goa) राज्य किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन अधिकारीणीचे सदस्य सचीव दशरथ रेडकर यांनी ही त्रिसदस्यीय समिती पाहणीसाठी पाठवली आहे. पारंपरीक मच्छिमार असोसिएशनचे अध्यक्ष रॉय बार्रेटो व आगुस्तिन फुर्तादो यांनी रेडकर यांची भेट घेऊन त्यांना या बेटाची पाहणी करण्याची विनंती केली. या बेटावर गाळ व कचरा टाकताना संबंधीतांनी कायद्याचे उल्लंघन केल्याचे यांनी रेडकर यांच्या निदर्शनास आणले आहे.

एरव्ही गाळ उपसल्यावर तो तेथेच टाकता येत नाही असा नियम आहे. हे बेट चिंचिणी व करमोणा यांच्यामधील नदीच्या पात्रामध्ये आहे. या बेटावर उपसलेला गाळ टाकलेला बार्रेटो यांनी प्रतिनिधींना दाखवला तसेच त्यामुळे खारफुटीचा नाश होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणले आहे.

साळ नदीतील (river) गाळ उपसणीला पारंपारीक मच्छिमारी समाजाचा व इतरांचा विरोध आहे. गाळ काढून या नदीतून जाळवाहतुक सुरु करण्याचा डाव आहे. त्यामुळे मच्छिमारी (Fishing) लोकांच्या उपजिविकेवर परिणाम होण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: रणजी क्रिकेटमध्ये गोव्याचा कर्णधार दर्शन मिसाळ चमकला

Goa Post Office: गोव्यात पोस्टाची सेवा ठप्प! देशभरातील इंटरनेट सेवेत बिघाड; बॅंकिंग सेवेला मोठा फटका

Bhutani Project: ‘त्‍या’ तिघांना अटक करा! सांकवाळच्या तीस महिलांसोबत कुतिन्हो यांची मागणी

Goa News: गोव्यात भूरूपांतरासाठी अनेक प्रस्ताव! 1 लाख 18 हजार 756 चौरस मीटर जमीनीवर लक्ष; 'नगर नियोजन'ने मागवले आक्षेप

Sattari Crime: वाळपईतील व्यावसायिकाला 'स्टॉक एक्स्चेंज'च्या व्याजाचे आमिष दाखवून एक कोटींचा गंडा! बंगळूरू येथील संशयितास अटक

SCROLL FOR NEXT