गोवा

Ganeshotsav: दीड दिवसाच्या गणपतीचे थाटात विसर्जन

गोमन्तक डिजिटल टीम

मुरगाव तालुक्यातील (Murmgao) दीड दिवसाच्या गणपतीचे थाटात विसर्जन करण्यात आले. वास्कोत मिरवणुकीचा धुमधडाका रात्री उशिरापर्यंत चालूच होता. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला काल उत्साह पूर्ण वातावरणात गणरायाचे घरोघरी आगमन झाले होते. त्यानंतर घरोघरी बालगोपाळ ते वृद्धांचा आनंद ओसंडून वाहत होता. दुपारी घुमट आरत्यांचा निनाथ ओसंडत होता. तसेच रात्री भजन फुगड्या आधी चालू होत्या.

दरम्यान आज गुरुवार (दि.01) रोजी आरत्या झाल्यानंतर गणपतीला नैवेद्य दाखवल्यानंतर सायंकाळी दीड दिवसाच्या गणपती विसर्जनाची तयारी सुरू करण्यात आली. गणपती पूजनासाठी पहिल्या दिवशी जशी तयारी करावी लागते तशीच तयारी गणपती विसर्जनापूर्वी करावी लागते. त्यानुसार प्रत्येक घरात लगबग सुरू होती. उत्तर पूजा केल्यानंतर गणपती विसर्जनाला सुरुवात झाली.

संध्याकाळच्या सत्रात आरत्या झाल्यानंतर रात्री 08 वाजल्यापासून विसर्जन मिरवणुका सुरू झाल्या. काही जणांनी संध्याकाळी सहा वाजता गणपती विसर्जन केले. तसेच रात्री उशिरापर्यंत दिंडी सहित विसर्जन मिरवणुका सुरू होत्या. येथील बायणा समुद्रकिनाऱ्यावर खारीवाडा, वाडे तळे शेकडो गणपतींचे विसर्जन करण्यात आले. प्रत्येक विसर्जन स्थळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

तसेच, दृष्टीचे कर्मचारी भाविकांना खोल समुद्रात जायला देत नव्हते. ते स्वतः गणपती हातात घेऊन खोल समुद्रात विसर्जित करीत होते. तसेच वाहतूक रहदारी सुरळीत राहावी यासाठी वाहतूक पोलिस तैनात करण्यात आले होते. वास्कोत नवेवाडे, बायणा, वाडे, मांगुर हिल, सडा, चिखली, दाबोळी या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत गणेश विसर्जन मिरवणुका चालू होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

टी-20, वनडे आणि कसोटी... हरमनप्रीत कौरने अचानक सोडले सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद, टीम इंडियाची धुरा आता कोणाकडे? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा! पगारवाढीपलीकडे OPS, कॅशलेस मेडिकलपासून रिस्क अलाऊन्सपर्यंत 'या' 9 प्रमुख मागण्या

गोव्यात सर्वात मोठा समाज, पण CM फक्त एकच; रवी नाईकांनंतर भंडारी समाजातील दिग्गज नेत्यांना संधी का मिळाली नाही? 2027 मध्ये दामू नाईकांचं काय?

Flydubai Flight Hijacking Plot: फ्लाईदुबई विमान हायजॅक मागे इराणचा हात? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 9/11 सारखा हल्ला घडवण्याचा होता प्लॅन VIDEO

Shivaji Maharaj Statue: पुतळा हटवण्याऐवजी जागाच खरेदीचा प्रस्ताव; सरकारच्या धोरणावर गोवा खंडपीठ नाराज

SCROLL FOR NEXT