Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Police: लाच प्रकरणी तीन पोलिस कर्मचाऱ्यांचे तत्काळ निलंबन

Goa Police: खंडणीसाठी कोणीतरी धमकावत असल्याची तक्रार तीन पोलिस कर्मचाऱ्यांनी केली खरी; मात्र त्यातून सत्य बाहेर येऊन तक्रारदारांनाच निलंबित व्हावे लागल्याची अजब घटना घडली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Police:

खंडणीसाठी कोणीतरी धमकावत असल्याची तक्रार तीन पोलिस कर्मचाऱ्यांनी केली खरी; मात्र त्यातून सत्य बाहेर येऊन तक्रारदारांनाच निलंबित व्हावे लागल्याची अजब घटना घडली आहे. वाहतूक पोलिस विभागातील हा प्रकार आहे.

एक महिला साहाय्यक उपनिरीक्षक आणि दोन हवालदारांवर वाहतूक पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी ही कारवाई केली.

निलंबन झालेल्यांत साहाय्यक उपनिरीक्षक समीना साळगावकर, हवालदार सुरेंद्र म्हामल आणि नीलेश तळकर यांचा समावेश आहे. हणजूण वाहतूक पोलिस विभागात हे तिन्ही कर्मचारी असताना त्यांच्याकडून खंडणी मागण्यासाठी

अज्ञाताने दूरध्वनी केल्याची तक्रार केली होती. खंडणी मागणाऱ्याने त्याच्याकडे हे तिघे वाहतूक नियमभंगाचे प्रकरण मिटविण्यासाठी लाच स्वीकारत असल्याचा व्हिडिओ असल्याचा दावा केला होता. मध्‍यंतरी 11 कर्मचाऱ्यांचा बदलीचा आदेश जारी केला होता, त्यात या तिघांचा समावेश होता.

साळगावकर आणि म्हामल यांची पणजी, तर तळकर याची मडगाव वाहतूक पोलिस विभागात बदली केली होती. गेल्या महिन्यात खंडणीसाठी दूरध्वनी आल्याची तक्रार या तिघांनी केल्यानंतर पोलिस खात्याने चौकशीस सुरवात केली होती. त्यादरम्यान त्यांची बदली केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT