Goa Rain Dainik Gomantak
गोवा

Yellow Alert In Goa: गोव्यात दोन दिवस यलो अलर्ट, परतीच्या पावसाचं धूमशान; शेतकरी चिंतेत!

Goa Weather Update: राज्यात परतीच्या पावसानं धूमाशान घातलंय. सोमवारी (ता. 7) सायंकाळी परतीच्या पावसानं सत्तरी, डिचोलीला अक्षरश: झोडपून काढलं.

Manish Jadhav

Goa News: राज्यात परतीच्या पावसानं धूमाशान घातलंय. सोमवारी (ता. 7) सायंकाळी परतीच्या पावसानं सत्तरी, डिचोलीला अक्षरश: झोडपून काढलं. यातच, हवामान विभागाकडून 8 आणि 9 ऑक्टोबर या दिवसांसाठी 'यलो अलर्ट' वर्तवण्यात आला आहे. येत्या दोन दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

सत्तरीत पावसाचा तडाखा!

सत्तरीतील काही भागांमध्ये विजेच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. अनेक ठिकाणी झाडांची पडझड होऊन मोठे नुकसान झाले आहे. तसेच, वीज तारांवर झाडे पडून वीज खांब उखडून पडल्याने वीज पुरवठाही खंडित झाला आहे. एका बाजूने धो-धो पाऊस तर दुसऱ्या बाजूने वादळी वारा यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. ब्रह्मकरमळी, खोतोडा आणि इतर भागात मोठ्याप्रमाणात झाडांची पडझड झाली. परतीच्या पावसाने घोलवाडा- खोतोडा येथे सिता राम घोलकर यांच्या घरावर झाड पडून मोठे नुकसान झाले.

अस्मानी संकट घोंगावतेय; शेतकरी चिंतेत

राज्यातील अनेक भागात परंपरागत भातशेती केली जाते. अनेक शेतकरी जूनच्या पहिल्या, दुसऱ्या आठवड्यात भात पेरणी करतात त्यामुळे रोपणी जुलै महिन्यात येते व सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये कणसे येऊन नोव्हेंबरच्या शेवटी कुठे भात कापणी होते. यंदा जून महिन्यात भात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना जुलैमधील मोठ्या प्रमाणात बरसलेल्या पावसाचा फटका बसला. मोठ्या प्रमाणात भातशेती कुजली आणि त्यातून सावरलेल्या भातशेतीला आता कणसे धरली असून जर परतीच्या पावसाचा जर येत्या काळात जोर वाढला तर पुन्हा शेतीवर अस्मानी संकट सावट घोंगावेल,अशी भीती असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT