IMD Rainfall Alert Dainik Gomantak
गोवा

Goa Weather Update: कडाक्याच्या थंडीत पावसाची दस्तक! गोव्यात पुन्हा बरसणार सरी; हवामान विभागाकडून 'यलो अलर्ट'

Yellow Alert In Goa: राज्यातील दोन्ही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला. या काळात 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

Manish Jadhav

पणजी: राज्यात पडलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे गोमंतकीय गारठलेले असताना पावसानं पुन्हा एकदा दस्तक दिली आहे. हवामान विभागाकडून बुधवार (4 डिसेंबर) साठी 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. राज्यातील दोन्ही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला. या काळात 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘फेंगल’ चक्रीवादळ (Fengal Cyclone) सध्या दक्षिण भारतात धुमाकूळ घालत आहे. या चक्रीवादळाचा परिणाम आता गोव्यावर (Goa) होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून गोव्यात गारठा वाढला आहे.

दरम्यान, चक्रीवादळामुळे राज्यात सोमवार, 2 डिसेंबरपासून पुढील तीन दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. रविवारी वाळपई (Valpoi) भागात पाऊस पडला. डिसेंबर महिन्यात गावागावांत जत्रोत्सव, फेस्त तसेच इतर कार्यक्रम होतात. मात्र, पावसाची शक्यता वर्तवल्यामुळे लोकांच्या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT