Goa Yellow Alert Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon 2024: दिवाळीच्या पहिला दिवशी पावसाची आंघोळ; गोव्यात तीन दिवस 'यलो अलर्ट'

Goa Yellow Alert: राज्यात पावसानं धूमशान घातलं आहे. आता ऐन दिवाळीतही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

Manish Jadhav

राज्यात पावसानं धूमशान घातलं आहे. आता ऐन दिवाळीतही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. आजपासून (28 ऑक्टोबर) दिवाळीला सुरुवात झाली आहे. मात्र पाऊस राज्यातील बळीराजाचं 'दिवाळ' काढणार असं दिसतयं.

30, 31 आक्टोबर आणि 1 नोव्हेंबर या दिवशी हवामान विभागाकडून 'यलो अलर्ट' वर्तवण्यात आला आहे. या तीन दिवसांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. याकाळात 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून गोमंतकीयांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पावसानं हाहाकार उडवला!

दरम्यान, परतीच्या पावसानं सत्तरी (Sattari), धारबांदोडा आणि डिचोलीमध्ये हाहाकार उडवला. सत्तरीतील काही भागांमध्ये विजेच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसानं झोडपून काढलं. अनेक ठिकाणी झाडांची पडझड होऊन मोठे नुकसान झाले. तसेच, वीज तारांवर झाडे पडून वीज खांब उखडून पडल्याने वीज पुरवठाही खंडित झाला. एका बाजूने धो-धो पाऊस तर दुसऱ्या बाजूने वादळी वारा यामुळे जनजीवन विस्कळीत झाले.

पडझडीच्या घटना

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पडझडीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. सत्तरीसह राज्यातील अनेक ठिकाणांहून पडझडीच्या घटना समोर आल्या. तत्पूर्वी, येत्या तीन दिवसांतही मुसळधार पावसामुळे पडझडीच्या घटनांमध्ये वाढ होऊ शकते. राज्यात एकीकडे दिवाळीची लगबग सुरु असताना दुसरीकडे पावसाचं घोंघावात असल्याने नागरिकांची ताराबंळ उडत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT