Rain  Dainik Gomantak
गोवा

IMD Goa: येत्या तीन दिवसात गोव्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता

काही ठीकाणी विजांच्या कडकडाट पावसाची शक्यता

दैनिक गोमन्तक

आज राज्यात अनेक ठीकाणी पावसाने हजेरी लावली असुन गेल्या चार दिवसात पावसामुळे अनेक भागात हाहाकार उडाला आहे. सत्तरीत ढगफुटीसारखा पाऊस पडण्याचा प्रकार घडला आहे. असे असताना येत्या तीन दिवसात राज्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता, तर काही ठीकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.

(IMD Goa predicts light to moderate rain in Goa for the next three days)

वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार राज्यात 18, 19 आणि 20 ऑक्टोबर रोजी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच उत्तर गोव्यात गडगडाटी वादळासह विजांचा कडकडाट आणि वारे सुमारे 40 किमी प्रतितास वेगाने वाहण्याची शक्यता असुन उत्तर गोव्यात गडगडाटी वादळासह पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

ढगफुटीसारख्या घटनांवर तज्ज्ञ काय म्हणतात?

सत्तरीत जो एकाच ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस पडण्याचे प्रकार घडला आहे आणि घडत आहे, हा वातावरण बदलाचा (क्लायमेट चेंज) परिणाम आहे. सत्तरी, धारबांदोडा आणि सांगे या तिन्ही तालुक्यांत पावसाचे प्रमाण अधिक आहे. कारण या ठिकाणी दाट जंगल आहे.

जागतिक तापमानामुळे उष्णतेचा दाब वाढत जातो. त्यामुळे बाष्पाचे ढग गतीने वितळतात आणि एकाच ठिकाणी पाऊस कोसळतो. परिणामी आपत्ती कोसळते. हे प्रकार लक्षात घेऊन सरकार, समाज आणि तज्‍ज्ञ यांनी एकत्रित येऊन उपाय योजले पाहिजेत. असे तज्ज्ञांचे मत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opposition Alliance: जनतेचे ऐका, महाआघाडी करा! दसऱ्यापर्यंत निर्णय घेण्याची सरदेसाईंची काँग्रेसकडे मागणी

खरी कुजबुज: बाबू पुन्हा आक्रमक...

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार थेट 69,000 रूपये होणार? 8व्या वेतन आयोगासमोर 3.833 फिटमेंट फॅक्टरची मागणी

CJP Protest Delhi: आंदोलकांवरील निर्बंधांवर सर्वोच्च न्यायालयाची पोलिसांना चपराक! रस्ते, मेट्रो आणि इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याचे आदेश; प्रशासनाचे दणाणले धाबे

Stray Dogs Beach: समुद्रकिनाऱ्यांवरील भटक्या कुत्र्यांची दहशत मोडून काढणार! पर्यटन खात्याचा 15 ऑक्टोबरचा अल्टीमेटम!

SCROLL FOR NEXT