Goa Weather Update Dainik Gomantak
गोवा

Yellow Alert Goa: पावसाचा जोर कायम राहणार! गोव्यात पाच दिवसांसाठी 'यलो अलर्ट'

Goa Monsoon 2024: आठवड्याच्या सुरुवातील उत्तर गोव्याला पावसाने झोडपून काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी देखील दोन्ही जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहणार असेही वेधशाळेने म्हटले आहे.

Pramod Yadav

Goa Monsoon 2024

पणजी: गोव्यात सोमवारी मुसळधार पावसाने दाणादाण उडवली. सत्तरी, डिचोली, वाळपई, होंडा या भागाला पावसाने झोडपून काढले. अनेक भागात पाणी साचण्यासह झाडे व घरांची पडझड झाली.

गोव्यात पुढील काही दिवस पावासाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने राज्यासाठी पाच दिवस यलो अलर्ट जारी करत सतर्कतेचा इशारा दिला आहे.

हवामान खात्याने आजपासून पुढील पाच दिवस (०३ ते ०७ सप्टेंबर २०२४) यलो अलर्ट जारी केला असून, मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. दोन्ही जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहणार असेही वेधशाळेने म्हटले आहे. याकाळात ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याचेही हवामान खात्याने म्हटलंय.

दम्यान, आज (मंगळवार) पुढील (दुपारी एकनंतर) एक ते तीन तास महत्वाचे असल्याचे हवामान खात्याने म्हटलं आहे. राज्यातील फोंडा, धारबांदोडा, सांगे, काणकोण या तालुक्यांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

गेल्या चोवीस तासांत गोव्यात वाळपईत सर्वाधिक पाऊस झाला. वाळपईत १८४.३ मिमि, फोंड्यात ११०.८ मिमि, साखळीत १०३.२ मिमि पावसाची नोंद झाली. तर, म्हापसा, पणजी, केपे, मडगाव आणि मुरगावात सर्वात कमी पावसाची नोंद झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जगाचा नकाशा अचूकतेने मांडण्याच्या UN च्या प्रस्तावाला भारताचा पाठिंबा, पण J&K आणि लडाखच्या सीमांबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिला स्पष्ट इशारा

Keri Ambulance Service: केरीला मिळाली 3 दिवसांत 108 रुग्णवाहिका; विधानसभेत आरोलकरांनी प्रश्न उपस्थित करताच सरकारची कार्यवाही

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

SCROLL FOR NEXT