Digmbar kamat Dainik Gomantak
गोवा

Digmbar Kamant: ‘मी रिटायर्ड हर्ट’, पण ‘आऊट’ नाही! दिगंबर कामत

सध्या फक्त विश्रांती घेत असल्याचा खुलासा

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: दिगंबर कामत भाजपात जाणार की काँग्रेसमध्येच राहणार याबाबत सध्या राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना ऊत आलेला असताना, ‘मी रिटायर्ड हर्ट’ झालेलो आहे. याचा अर्थ मी ‘आऊट’ झालेलो नाही. मी अजूनही ‘नॉट आऊट’च आहे’, असे सूचक उद्‌गार त्यांनी शनिवारी काढले.

शनिवारी पत्रकारांनी त्यांना त्यांच्या राजकीय स्थितीबद्दल विचारले असता, माझ्याबद्दल यापूर्वीही अफवा पसरत होत्या, आताही त्या पसरत आहेत. पण मी त्याची पर्वा करत नाही. मी त्यांना उत्तर देण्यास कटिबद्ध नाही. मी फक्त मडगावच्या मतदारांना उत्तर देण्यास कटिबद्ध आहे. सध्या तरी माझे आत्मपरीक्षण सुरू आहे व कोणताही निर्णय मी घेतलेला नाही.

ते पुढे म्हणाले, मी किंचितही डिस्टर्ब नाही. मी मानसिकदृष्ट्या खंगलेलोही नाही. सत्ता असो किंवा नसो मला काही फरक पडत नाही. जोपर्यंत मडगावकर माझ्याबरोबर आहेत, तोपर्यंत आणखी कोण काय म्हणतो याची मी पर्वाही करत नाही, असे त्यानी म्हटले.

मी ‘रिटायर्ड हर्ट’ याचा कुणी वेगळा अर्थ घेऊ नये. मी सध्या विश्रांती घेत आहे. त्यासाठीच मला कोणतीही जबाबदारी देऊ नका एव्हढेच मी त्यांना सांगितले होते, असे ते म्हणाले.

काँग्रेस आमदार फोडण्याचा तुमचा प्रयत्न होता का? असे विचारले असता कामत म्हणाले, कोण मला ‘फुटीचा कॅप्टन’ म्हणतो, तर कोण ‘व्हाईस कॅप्टन’ म्हणतो. मी कोलकात्याहून शनिवारी आल्यावर थेट पर्तगाळ येथे गेलो. दुसऱ्या दिवशी मी माझ्या घरीच होतो. त्या दिवशी मला भेटायला काही आमदार आले होते ही गोष्ट जरी खरी असली, तरी मी त्यांना घरातून हाकलून लावायला पाहिजे होते का असा प्रतिसवाल त्यांनी केला. मला जर तोडफोड करायची असती तर मी घरी बसलो असतो का असा सवाल त्यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT