Goa CM Pramod Sawant Along With MLA Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: मुख्यमंत्र्यांसोबत दिल्ली भेटीनंतर मंत्रिपदाबाबत पहिल्यांदाच बोलले मांद्रेचे आमदार, म्हणाले..

Goa Cabinet Reshuffle: फेब्रुवारीतील हिवाळी अधिवेशन उरकल्यानंतर फेरबदल होणार का? असे मत राजकीय तज्ञ मांडत आहेत.

Pramod Yadav

Goa Cabinet Reshuffle

मांद्रे: गोव्यात मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांना वेग आला त्यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काही आमदारांना घेऊन डिसेंबरमध्ये दिल्ली दौरा केला. या आमदारांपैकी कोणालातरी मंत्रिमंडळात स्थान मिळेल, अशी जोरदार चर्चा सुरु झाली. या आमदारांमध्ये उपस्थित असलेल्या मांद्रेच्या आमदारांनी पहिल्यांदाच आता याप्रकरणी भाष्य केले आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मांद्रेचे आमदार जीत आरोलकर, वास्कोचे आमदार दाजी साळकर आणि मयेचे आमदार पेमेंद्र शेट यांच्यासोबत दिल्ली दौरा केला होता. मुख्यमंत्र्यांनी आमदारांना घेऊन जैसलमेर मार्गे चार्टरद्वारे दिल्ली गाठली होती. फेरबदलाच्या चर्चांना ऊत आले असताना या दौऱ्याने खळबळ निर्माण झाली होती. शिवाय यानंतर लगेच फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण, फेरबदलाला अद्याप मूहूर्त लागलेला नाही.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांसोबत या दौऱ्यात सहभागी असलेल्या आमदार जीत आरोलकरांनी मंत्रिपदाबाबत पहिल्यांदाच भाष्य केले आहे. 'मंत्रिपदाची मला इच्छा नाही. मला त्याबाबत काही अधिकृत माहिती मिळाल्यास मी त्यावर भाष्य करेन. पण, सध्यातरी असे काही नाही. मी तिथे खूश आहे आणि कामही व्यवस्थित सुरु आहे', असे आमदार आरोलकर म्हणाले.

'आमदार म्हणून निवडून आल्यानंतर मतदारसंघाचा विकास करण्यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. भविष्यातील कामे, युवकांच्या कामावर मी सध्या माझे लक्ष आहे. बाकिच्या कोणत्याही विषयावर लक्ष विचलित करण्याची माझी इच्छा नाही. माझे शुभचिंतक माझे कार्यकर्ते माझ्या कामावर खूश आहेत. येत्या दोन वर्षात विकास काय असतो हे तुम्हाला दिसेल', असे आरोलकर पुढे म्हणाले.

फेरबदल आत्ताच नाही

मंत्रिमंडळ फेरबदल आत्ताच होणार नाही, असे मत सुरुवातीला प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आणि नंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मांडल्याने मतामुळे फेरबदलाच्या चर्चा तूर्तास थांबल्या आहेत. दरम्यान, फेब्रुवारीतील हिवाळी अधिवेशन उरकल्यानंतर फेरबदल होणार का? असे मत राजकीय तज्ञ मांडत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Blue Flag: मांद्रे, गालगीबागला 'ब्लू फ्लॅग' मानांकन; प्रत्यक्ष ध्वजारोहणासाठी प्रतीक्षा कधी संपणार?

Sarfaraz Alam Film: ज्या शिक्षकांनी घडवले डॉक्टर, अभियंते, आयएएस; त्यांनाच स्मार्ट बोर्डच्या युगात जुळवून घेताना संघर्ष

X Post Scheduling Feature: WhatsApp नंतर आता X वरही भन्नाट फीचर! युजर्संना 18 महिने आधी पोस्ट शेड्यूल करता येणार; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

8th Pay Commission: 8वा वेतन आयोग 2028 पर्यंत टळल्यास मोठा फटका? थकबाकीमुळे बिघडू शकतो हिशोब; अहवालात समोर आली महत्त्वाची माहिती

Goa Shipyard Dredger Launch: आंतरराष्ट्रीय जहाजबांधणीत गोवा शिपयार्डची झेप; अत्याधुनिक हायब्रीड ड्रेजरचे यशस्वी लॉन्चिंग

SCROLL FOR NEXT