Illegal Sand Extraction Dainik Gomantak
गोवा

Illegal Sand Extraction: डिचोलीत बेकायदेशीरपणे रेतीची वाहतूक; ट्रक जप्त

बेकायदेशीरपणे रेतीची वाहतूक केल्याप्रकरणी डिचोली पोलिसांनी केलेल्या कारवाईत टिपर ट्रक जप्त करून ट्रकचालकाला अटक केली.

दैनिक गोमन्तक

Illegal Sand Extraction

बेकायदेशीरपणे रेतीची वाहतूक केल्याप्रकरणी डिचोली पोलिसांनी केलेल्या कारवाईत टिपर ट्रक जप्त करून ट्रकचालकाला अटक केली. अटक केलेल्या ट्रकचालकाचे नाव राजेश चव्हाण असे आहे. बुधवारी (ता.३०) उत्तर रात्री सव्वादोन वाजण्याच्या सुमारास पोलिस उपनिरीक्षक विकेश हडफडकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी ही कारवाई केली.

मिळालेल्या माहितीनुसार, मायणा-न्हावेली येथील फेरीधक्क्याजवळून बेकायदेशीरपणे रेतीची वाहतूक करण्यात येत होती. याप्रकरणी कारवाई करताना पोलिसांनी जीए-०९-टी-६२६५ या क्रमांकाचा टीपर ट्रक ताब्यात घेतला. ट्रकचालक राजेश चव्हाण याच्यासह ट्रकमालक आनंद दळवी (सावर्डे) आणि रेती व्यावसायिक सुशांत नाईक (बेतकी) यांच्याविरोधात कायद्यान्वये गुन्हा नोंद केला.

पोलिसांची धडक कारवाई

डिचोलीचे पोलिस निरीक्षक राहुल नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय शिवा नाईक याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत. दोन महिन्यांपूर्वी पोलिसांनी अशीच कारवाई करताना बेकायदेशीरपणे रेतीची वाहतूक करणारे दोन ट्रक जप्त करून दोघांना अटक केली होती. पोलिसांच्या या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drug Network Colvale Central Jail: कोलवाळ कारागृह बनले ड्रग्ज रॅकेटचे कंट्रोल रूम; आंतरराज्य जाळे, 43 लाखांचा ड्रग्ज साठा जप्त, 5 जण अटकेत

Mallikarjun Kharge Attacks Amit Shah: 'लाठीमारासाठी शहाच जबाबदार','जनता तुम्हाला बंद खोलीतून बाहेर खेचून काढेल!' मल्लिकार्जुन खर्गेंचा गृहमंत्री अमित शहांना राज्यसभेतून थेट इशारा

Goa Electricity Employees Suspended: वीज धक्क्यांमुळे मृत्यू प्रकरणांवर मोठी कारवाई!खात्यात निलंबनाचे झटके; 3 साहाय्यक अभियंत्यांसह 14 कर्मचाऱ्यांवर कारवाई

Goa POP Ganesh Idols Restrictions: यंदाही 'पीओपी'च्‍या गणेशमूर्ती रोखणे अशक्‍य; आदेशातच अनेक पळवाटांमुळे अंमलबजावणी अशक्य

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

SCROLL FOR NEXT