Mapusa Press Conference Dainik Gomantak
गोवा

Mapusa: वादग्रस्त शेड विरोधात कोर्टात जाणार; गैरप्रकार असल्याचा दावा

Illegal Construction At Mapusa: ही जागा कोमुनिदादची असून त्यांनी सामाजिक कार्य म्हणून म्हापसा ग्रामस्थ हिंदू सभा समितीस दिली

गोमन्तक डिजिटल टीम

दत्तवाडी, म्हापसा येथील स्मशानभूमी शेजारील खुल्या कोमुनिदाद जागेत वादग्रस्त वर्कशॉप उभारण्यासाठी पोलादी शेडचे बांधकाम सुरू आहे. मात्र, या व्यावसायिकरणाला स्थानिक सामाजिक कार्यकर्ते संजय बर्डेंनी तीव्र आक्षेप घेतला. हा गैरप्रकार असून याविरोधात आठवड्याभरात आपण उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शुक्रवारी (ता.१९) म्हापशात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अनिल केरकर, संजू तिवरेकर, सीतेश मोरे, अजित च्यारी हजर होते.

संजय बर्डे म्हणाले की, ही जागा कोमुनिदादची असून त्यांनी सामाजिक कार्य म्हणून म्हापसा ग्रामस्थ हिंदू सभा या समितीस दिली. अशावेळी या समितीला ही जागा परस्पर दुसऱ्या कुणालाच भाडेतत्त्वावर देता येत नाही. तरीही, ती एका लोकप्रतिनिधीची भागिदारी असलेल्या कंपनीस वर्कशॉप उभारण्यासाठी दिली.ही जागा २२,३०० चौ.मी. आहे. मात्र जागेचे पार्टिशन झालेले नाही. तसेच संबंधितांनी १५०० चौ. मी. जागेसाठी सनद मिळविली, असा आरोपही त्यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games 2026: तिरंदाजीत भारताची 'गोल्ड' हॅटट्रिक! पुरुष कंपाउंड संघाने मिळवला रोमांचक विजय; फायनलमध्ये चीनला दिली मात

Kharif Sowing Area Decline: पेरणीखालील क्षेत्र घटले, तरी खरीप उत्पादनाला फटका नाही; रब्बीसाठी केंद्राचे 177.72 दशलक्ष टनांचे लक्ष्य

Lucky Zodiac Signs: राहू-केतूची उलटी चाल ठरणार वरदान! 'या' राशींच्या आयुष्यात येणार सुख, संपत्ती आणि समृद्धी; मिळणार बक्कळ पैसा

Goa Water Crisis: राज्य गंभीर पाणी संकटाच्या दिशेने; सत्तरीतील नद्या सप्टेंबरमध्येच तळाला, 31 टक्के पावसाची तूट

Onion Price: कांद्याने आणले गृहिणींच्या डोळ्यांत पाणी; नवा कांदा 60, जुन्याचा दर 75 रुपये किलो

SCROLL FOR NEXT