पणजी: गोवा पर्यटन विभागाने वार्का समुद्रकिनाऱ्यावर घडलेल्या एका बेकायदेशीर वाळू उपशाच्या प्रकाराची गांभीर्याने दखल घेतली आहे. १८ जून रोजी प्राप्त झालेल्या व्हिडिओ क्लिपिंगमध्ये एका जेसीबीद्वारे किनाऱ्यावरून वाळू उपसण्याची आणि नैसर्गिक ड्यून रचनेत फेरफार करतानाची दृश्ये समोर आल्याने ही कारवाई करण्यात आली.
हा प्रकार पर्यावरण संरक्षण अधिनियम, १९८६ अंतर्गत जारी करण्यात आलेल्या कोस्टल रेग्युलेशन झोन (सीआरझेड) अधिसूचनेचे तसेच गोवा पर्यटनस्थळ संरक्षण व देखभाल अधिनियम, २००१ चे सरळ उल्लंघन ठरतो, असे पर्यटन विभागाने स्पष्ट केले आहे.
या प्रकरणात कारवाईची प्रक्रिया पुढे नेत पर्यटन विभागाने गोवा कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी आणि कोलवा पोलिस स्थानकाकडे हा प्रकार अधिक तपासासाठी सुपुर्द केला आहे.
दोषींवर कायद्याप्रमाणे कारवाई
या प्रकारावर भाष्य करताना पर्यटन संचालक केदार नाईक यांनी सांगितले की, गोव्याच्या किनारी भागातील नैसर्गिक वारसा व पर्यावरणाचे संरक्षण करण्यास विभाग कटिबद्ध आहे.
समुद्रकिनाऱ्यावर घडणाऱ्या बेकायदेशीर, पर्यावरणविघातक कृतींना माफ केले जाणार नाही. दोषींवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई केली जाईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.