Illegal mountaineering at Verna Dainik Gomantak
गोवा

वेर्णा येथे बेकायदेशीर डोंगरकापणी, वाहनांची कागदपत्रे पोलिसांच्या ताब्यात

कंत्राटदाराकडून स्थानिकांना उद्धट उत्तर

दैनिक गोमन्तक

मडगाव : वेर्णा (Verna) येथे मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीररित्या डोंगरकापणी केल्याचे उघडकीस आले असून, स्थानिकांनी या संदर्भात तक्रार केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील भरारी पथकाने येऊन त्या जागेची आज (गुरुवारी) पाहणी केली.

ही डोंगरकापणी करण्यासाठी ज्या यंत्राचा आणि वाहनांचा वापर करण्यात आला त्याची कागदपत्रे मायणा कुडतरी पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत, अशी माहिती पोलिस (police) निरीक्षक मोहन गावडे यांनी दिली.

स्थानिकांच्या दाव्याप्रमाणे हा प्रकार मागचे कित्येक दिवस सुरू असून काल गावातील काही व्यक्ती या बाजूने जात असताना त्यांनी हे काम पाहिल्याने त्याचा गवगवा झाला. या संबंधी पंचायतीकडे (Panchayat) तक्रार करूनही त्यांनी याची दखल घेतली नाही, असा आरोप केला.

हे काम करणाऱ्या कंत्राटदाराला याबद्दल जाब विचारला असता आपली मशिनरी सध्या काम नसताना बंद होती त्यासाठी आपण हे काम हाती घेतले असे, उद्धट उत्तर त्याच्याकडून मिळाले असे स्थानिकांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: रोहित शर्मा वनडे वर्ल्ड कप खेळणार की नाही? 'हिटमॅन'च्या उत्तरानं चाहत्यांची धाकधूक वाढवली; पाहा व्हायरल व्हिडिओ!

Goa Agriculture: गोव्यात चारा टंचाईवर सरकारचा मोठा प्लॅन! लागवड क्षेत्राच्या 5 टक्के जमिनीवर चारा पिके; 10 हजार हेक्टरचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य

गुन्ह्यातील पीडितांना मिळणार आर्थिक आधार! गोवा सरकारची नवी 'पीडित भरपाई योजना २०२६' लागू; ॲसिड हल्ल्यात 5 लाखांपर्यंत मदत

Goa Weather: अखेर पणजीत पावसाचे अर्धशतक! राज्यात पावसाचा जोर मंदावला; वाळपईत सर्वाधिक 107 इंच, पणजीत सर्वात कमी 50 इंच

Noise Pollution: 'आवाज नको, डीजे तुझ्या...!' गणेशोत्सवात कर्णकर्कश संगीताला विरोध; भक्ती, परंपरा आणि संस्कृती जपण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT