liquor seized In Calangute Dainik Gomantak
गोवा

liquor seized In Calangute : कळंगुटमध्ये 3.5 लाखांचा बेकायदेशीर मद्यसाठा जप्त

बिलेच नाहीत : ‘अबकारी’ची धडक मोहीम

दैनिक गोमन्तक डिजिटल

किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात बेकायदा मद्यविक्री होत असल्याने अबकारी खात्याच्या अंमलबजावणी कक्षाने धडक मोहीम सुरू केली आहे. कळंगुट परिसरातील काही मद्य दुकानांवर छापे टाकून सुमारे 3.50 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त केला.

या मद्यसाठा खरेदी करताना दुकानदारांकडे त्याचा वाहतूक परवाना तसेच बिले नसल्याने ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई अशीच खात्यातर्फे सुरू राहणार असल्याची माहिती अबकारी खात्याचे संचालक नारायण गाड यांनी दिली.

पर्यटन मोसम असल्याने मोठ्या प्रमाणात बेकायदा मद्यसाठा खरेदी होत असल्याने कळंगुट येथे अबकारी खात्याने ही कारवाई केली.

‘अबकारी’चा महसूल 865 कोटींवर

अबकारी खात्याने २०२१ -२२ साली सुमारे ६५० कोटी महसूल विविध शुल्क व परवान्यांमधून जमवला आहे. २०२२-२३ या सालात हा महसूल ८६५ कोटींवर पोहचला. यावरून खात्याच्या महसुलात सुमारे ३३ टक्के वाढ झाली आहे.

खात्यातर्फे वेळोवेळी होणारी तपासणी तसेच ऑनलाईन पद्धतीमुळे महसुलाची होणारी गळती थांबली आहे. राज्यात येणारी तसेच बाहेर जाणारे प्रत्येक वाहन तपासण्याचे निर्देश देण्यात आले आहेत,असे गाड म्हणाले.

"बेकायदा मद्यसाठा विक्रीप्रकरणी कारवाई केलेल्या दुकानधारकांना शोकॉज नोटीस बजावून त्यांचा मद्य परवाना का रद्द करण्यात येऊ नये, अशी विचारणा केली जाते. त्यांची सुनावणी घेण्यात येते. यानंतर त्यांनी मांडलेल्या बाजूच्या आधारावर कारवाई केली जाते."

नारायण गाड, अबकारी संचालक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT