Illegal Fishing in Goa Dainik Gomantak
गोवा

Illegal Fishing in Goa : झुआरी नदीत रात्रीच्‍या अंधारात ट्रॉलर्सद्वारे बेकायदा मासेमारी

ऑल गोवा स्मॉल स्केल रिस्पॉन्सिबल फिशरिज युनियनने 27 जून रोजी मत्स्यव्यवसाय संचालकांकडे तक्रार

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji : झुआरी नदीत रात्रीच्‍या वेळी ट्रॉलर्सद्वारे बेकायदा मासेमारी सुरू असल्याची तक्रार मत्स्योद्योग खात्याकडे करण्‍यात आलेली आहे. त्‍यावर, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा खात्‍याने दिला आहे.

जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत यांत्रिकी पद्धतीने समुद्रातील मासेमारी करण्‍यास बंदी आहे. त्‍यामुळे ट्रॉलर्सवाल्‍यांनी आपला मोर्चा आता नद्यांकडे वळविला आहे. सेंट जासिंटो बेटापासून गोवा शिपयार्डपर्यंत झुआरी नदीत रात्रीच्‍या वेळी ट्रॉलर्सद्वारे अवैध मासेमारी सुरू आहे. याबाबत ऑल गोवा स्मॉल स्केल रिस्पॉन्सिबल फिशरिज युनियनने 27 जून रोजी मत्स्यव्यवसाय संचालकांकडे तक्रार केली होती. मात्र अजूनही ही अवैध मासेमारी सुरूच आहे.

जून आणि जुलै असे दोन महिने नदीतच नव्‍हे तर समुद्रातही यांत्रिकी पद्धतीने मासेमारी करण्‍यास बंदी आहे. झुआरी नदीत ट्रॉलर्सद्वारे अशी बेकायदा मासेमारी होत असेल तर आमची टीम या प्रकाराची शहानिशा करून दोषींवर कडक कारवाई करेल.

दीपेश प्रियोळकर, मत्‍स्‍योद्योग खात्‍याचे संचालक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT