illegal encroachment in Mapusa Dainik Gomantak
गोवा

म्हापशात रातोरात उभारला बेकायदा गाडा

बसस्थानकाशेजारी कोमुनिदादच्या जमिनीत अतिक्रमण

दैनिक गोमन्तक

म्हापसा : येथील नवीन बस स्थानकाशेजारीच रातोरात नवीन गाडा बेकायदेशीररित्या उभारल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. नवीन कदंब बस स्थानकाच्या बाजूला मोकळ्या जागी पदपथाच्या बाजूला हा गाळा उभा केला आहे. कोमुनिदादच्या जागी मोकळ्या ठिकाणी हा गाळा आणून ठेवला असल्यामुळे कोमुनिदाद समिती व पालिका मंडळाच्या वरदहस्तानेच हा गाळा उभारल्याचा संशय स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केला आहे.

म्हापसा पालिका मंडळ हे नेहमीच शहरातील बेकायदा अतिक्रमणावरून चर्चेत असते. आता म्हापसा-गिरी रस्त्याच्या बाजूने आलेल्या या नवीन गाळ्यामुळे पुन्हा पालिका मंडळ चर्चेत आले आहे. यापूर्वी अशाच प्रकारे दत्तवाडी तसेच खोर्ली भागात गाळेवजा दुकानांवरून गदारोळ झाला होता. शिवाय तत्कालीन पालिका मंडळाच्या बैठकीत बेकायदा गाळ्यांवरून नगरसेवक एकमेकांना लक्ष्य करत होते.

याआधीही म्हापशातील गावसावाडा येथील शेतजमीन बुजवून तिथे बेकायदेशीर गाळेवजा दुकान थाटण्यात आले होते. यासंबंधी स्थानिक नगरसेवकांनी केलेल्या तक्रारीकडे पालिकेने दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला होता.

राष्ट्रीय महामार्गाच्या नजीक म्हापसा नदीकिनारील खारफुटीची झाडे कापून मोठ्या प्रमाणात ही शेतजमीन बुजविण्यात आली होती. या प्रकरणी वेळोवेळी स्थानिकांनी तसेच विरोधी गटनेत्यांनी आवाज उठविला होता. तरीही म्हापसा पालिका किंवा संबंधितांकडून कारवाई करण्यात आली नव्हती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT