Katharina Poggendorf-Kakar Canva
गोवा

गोव्यात सौंदर्य, पर्यावरण टिकवणाऱ्या उपक्रमांची अत्यंत आवश्यकता, स्थानिकांमुळेच राज्याच्या प्रेमात; कॅथरीना

Goa News: ज्यांना रात्री पार्टी करण्याचे स्वातंत्र्य आहे आणि ज्यांची सकाळ आलिशान जीवनशैलीत शांततेत उजाडते अशा श्रीमंत लोकसंख्येचे गोव्यावर होणारे आक्रमण हे स्पष्टपणे शाश्वततेच्या विरोधात आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa's Vibrant Culture Faces Threats from Tourism and Development

कॅथरीना पोगेनडार्फ-काकर (लेखिका आणि मानववंश शास्त्रज्ञ)

ज्यांना रात्री पार्टी करण्याचे स्वातंत्र्य आहे आणि ज्यांची सकाळ आलिशान जीवनशैलीत शांततेत उजाडते अशा श्रीमंत लोकसंख्येचे गोव्यावर होणारे आक्रमण हे स्पष्टपणे शाश्वततेच्या विरोधात आहे. कोविड काळानंतर गोव्यातील भूमी आणि सामाजिक परिस्थितीचे परिवर्तन झपाट्याने झाले, ज्यातून गोव्यात मोठ्या प्रमाणावर सामाजिक ओघ वाढला तसेच गोव्यातील गुंतवणुकीतही प्रचंड वाढ झाली.

रात्री जल्लोषपूर्ण पार्टी, सकाळ कॉफी पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकत आणि संध्याकाळी समुद्रकिनाऱ्यावर निवांत फेरफटका ही आपण ज्याचा विचार करू शकतो अशा विलासी जीवनशैलीची एक रम्य कल्पना आहे. मात्र जर त्यामुळे आपल्यावर असंख्य लोकांचे आक्रमण होत असेल आणि हे आक्रमक बिघडणाऱ्या पर्यावरणाबद्दल आणि पर्यावरणीय समतोलाबद्दल जागरूक नसतील तर ते नक्कीच शाश्वत नाही.

आज गोव्यात मोठमोठे बांधकाम प्रकल्प उभे राहत आहेत. या मोठ्या बांधकाम प्रकल्पांमुळे गोव्याच्या गावांची सांस्कृतिक जडणघडण विस्कळीत होत चालली आहे आणि स्थानिक लोकांमध्ये एक प्रकारची असुरक्षिततेची भावना निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे. बाहेरून येणाऱ्या या लोकांना खरोखरची साधी जीवनशैली जगण्यात रस नाही तर त्यांना सारेच काही हवे आहे. त्यांना निसर्गही हवा आहेच आणि त्याचबरोबर त्यांची शहरी आणि आधुनिक जीवनशैलीही त्यांना इथे पुन्हा तयार करायची आहे.

गोवा हे शहरी तोंडवळा असलेले ठिकाण आहे. गोव्यातील गावात तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी सहज मिळतील ज्या तुम्हाला हिमालयामधील गावांमध्ये मिळणार नाहीत. 21 वर्षांपूर्वी मी स्वतः माझ्या दिवंगत पतीबरोबर (जगप्रसिद्ध मनोविश्लेषक सुधीर काकर) दक्षिण गोव्यातील बाणावली या गावात राहायला आले. गोवा त्या काळात जे काही लोकांना देत होता ते पाहून मी मंत्रमुग्ध झाले होते परंतु ती मंत्रमुग्धता आता शिल्लक राहिलेली नाही. माझ्या मनात असलेली सारी दु:स्वप्ने आता गोव्यात साकार होत चालली आहेत.

मी जेव्हा येथे पहिल्यांदा आले तेव्हा मी या राज्याच्या प्रेमात पडले त्याचे कारण होते स्थानिकाकडून मिळणारे आदरातिथ्य. गोव्यात येणारे दिल्लीवासी आता घर बांधून त्याभोवती भल्या मोठ्या भिंती उभ्या करत आहेत. गोव्याच्या गावांमधील उबदार आणि घरगुती वातावरण त्यामुळे बदलत चालले आहे. गोव्याचे सौंदर्य आणि पर्यावरण टिकवून ठेवतील अशा उपक्रमाची आज अत्यंत आवश्यकता असून स्थानिक संस्कृतीसोबत संवाद साधणे आणि तिचा आदर ठेवणे हे अत्यंत गरजेचे आहे. 

दक्षिण गोव्यातील जंगले वाचवण्यासाठी सुरू झालेली ‘सेव्ह मोलेम’ सारख्या चळवळीने विविध गटांना एकत्र केले आणि अशा सहयोगी प्रयत्नांमुळे भविष्यकालीन उपक्रमांना प्रेरणा मिळू शकते याचा दाखलाही दिला. अशा चळवळी एका उदात्त हेतूसाठी समाजाला एकत्र करता येते हे दर्शवणारी आणि प्रोत्साहन देणारी चिन्हे आहेत. परस्परांचे ऐकणे आज अतिशय आवश्यक बनले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bhandari Samaj Goa: अशोक नाईक गटाला दिलासा, संस्था महानिरीक्षकांचा निवाडा रद्दबातल; भंडारी समाजातील संघर्ष

Adil Shah Palace In Goa: विकासाची लाट, आदिलशाही पॅलेसची 'वाट'; सामाजिक कार्यकर्त्या सिसील रॉड्रिगीज यांची आर्त हाक!

Desmond Costa Goa Revolution: ठाम उभे राहून क्रांती करण्याची गरज... गोव्यातील तरुणांनी संघटना उभारावी

Goa News Updates: 'ज्यांची बाजू खोटी असते तेच...'; कळसा-भांडूरा प्रकल्पप्रकरणी सुभाष शिरोडकरांचा हल्लाबोल; वाचा दिवसभरातील घडामोडी

Goa Politics Bhutani Project: भूतानी प्रकल्पावरुन राजकारण तापलं, ज्येष्ठ नागरिकांचे पाच दिवसापासून उपोषण; आक्रमक आलेमावांनी मागितला मुख्यमंत्र्यांचा राजीनामा

SCROLL FOR NEXT