Illegal Construction  Dainik Gomantak
गोवा

गायक मिका सिंगकडून हणजूण किनारी अवैध बांधकाम

माहिती अधिकार कार्यकर्त्यांकडून तक्रार दाखल

दैनिक गोमन्तक

कळंगुट: प्रसिद्ध गायक मिका सिंग उर्फ अमरिक सिंग याच्याकडून हणजुणच्या किनारी भागात सिआरझेड नियमांचे उल्लंघन करत रहिवासी प्रकल्प तसेच सुरक्षित भिंतीचे अवैध बांधकाम सुरू आहे. या प्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते रवी हरमलकर, गेम्बिनो ड्रेगो यांनी बुधवारी राज्य नगर नियोजन प्राधिकरणाच्या कार्यालयात तक्रार दाखल केली आहे.

(Illegal construction In Goa by singer Mika Singh)

हणजुण-कायसुव पंचायत क्षेत्रातील सेंट मायकल वाडो, सर्वे क्र. 603/1 येथे मिल्का सिंग यांने हणजुणच्या किनारी भागात स्वत:च्या घर, तसेच संरक्षण भिंतीचे बांधकाम करताना गोवा पंचायत राज कायद्याचा भंग केला. शिवाय सागरी क्षेत्र नियमांचेही उल्लंघन केले. याबाबत हणजुण-कायसुव पंचायत कार्यालयात 15 मे रोजी तक्रार दाखल केली होती. याची दखल घेत वादग्रस्त बांधकामाची पंचायत मंडळाकडून पाहाणी करण्यात आली होती. परंतू सिआरझेड कायद्याचे खुलेआम उल्लंघन झाले असतानाही मिका सिंगला केवळ नोटीस बजावण्यात आल्याचे हरमलकर यांनी सांगितले.

मिका याने कायदा धाब्यावर बसवून बांधकाम केले आहे. त्याच्यावर आणि त्या वादग्रस्त बांधकामावर कारवाई व्हावी अशी मागणी हरमलकर, ड्रेगो यांनी केली आहे.

मिका सिंगने आपल्या प्रसिद्धी आणि वलयाचा दुरुपयोग करीत हणजुणच्या किनारी भागात स्थानिक पंचायत, नगरनियोजन विभाग तसेच सागरी क्षेत्र नियमांचे खुलेआम उल्लंघन करीत बेकायदा बांधकाम केले. त्याच्यावर राज्य नगर नियोजन, उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालय, सिआरझेड प्राधिकरणाकडून त्वरित कारवाई करण्यात यावी. अन्यथा ग्रामस्थांसहित तीव्र आंदोलन केले जाईल.

रवी हरमलकर, माहिती अधिकार कार्यकर्ता

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT