Illegal Construction Demolished at Anjuna  Dainik Gomantak
गोवा

Anjuna News: पोलिस बंदोबस्तात हणजुणेतील बेकायदा गाळा पाडला

Illegal Construction Demolished: गाळा पाडण्याचे आदेश याआधीच उच्च न्यायालयाकडून देण्यात आले होते

गोमन्तक डिजिटल टीम

हणजुणे - कायसुव पंचायत क्षेत्रातील प्रभाग क्रं. ११ तसेच सर्वे क्रं. १३२/१२ मधील रॉयसी फर्नांडिस यांच्या मालकीचा बेकायदेशीर कार्यरत असलेला गाळा सोमवारी बार्देश तालुक्याचे दंडाधिकारी गौरीश नाईक यांच्या उपस्थितीत पाडण्यात आला.

हा गाळा पाडण्याचे आदेश याआधीच उच्च न्यायालयाकडून देण्यात आले होते व त्यानुसार गाळ्याला संबंधित अधिकाऱ्यांनी सील ठोकले होते.

दरम्यान, गाळ्याचे मालक रॉयसी फर्नांडिस कायद्याचे उल्लंघन करून गाळा चालवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सोमवारी दुपारी सर्व सोपस्कार पूर्ण करून पोलिस बंदोबस्तात हा गाळा पोकलीनच्या साहाय्याने पाडण्यात आल्याची माहिती बार्देशचे संयुक्त दंडाधिकारी गौरीश नाईक यांनी दिली. यावेळी हणजुणे पोलिस स्थानकाचा पोलिस फौजफाटा घटनास्थळी दाखल होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Single Women: एकल महिलांना दया नव्हे, सन्मानाची गरज

AI Deepfake Content: डीपफेकच्या वाढत्या धोक्याविरोधात मोदी सरकार आक्रमक; सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी नियम अत्यंत कडक

The Taxation Bill 2026: फ्री UPI पेमेंटचे दिवस आता संपणार? लोकसभेत गदारोळात नवीन टॅक्स बिल संमत; सामान्य नागरिकांच्या खिशावर होणार परिणाम?

दारुची नशा अन् एआयचा किळसवाणा खेळ! चालत्या ट्रेनमध्ये ChatGPT वर बुरखाधारी महिलेचा बनवला आक्षेपार्ह फोटो; भामटा पोलिसांच्या कचाट्यात VIDEO

Usha Nadkarni: पतीशी कोणतंही नातं नाही, मुलगा आई मानत नाही... 80 व्या वर्षीही एकट्याच आयुष्य जगतात उषा नाडकर्णी, वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT