Curti Khandepar Dainik Gomantak
गोवा

Curti: कुर्टीतील बेकायदा बांधकामे जमीनदोस्त! अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे दणाणले; पंचायतीची धडक कारवाई

Illegal construction in Curti: बेकायदा बांधकामांवर पंचायतीने बुलडोझर फिरवल्यामुळे पंचायत क्षेत्रात रस्त्याच्या कडेला व इतर ठिकाणी अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Sameer Panditrao

फोंडा: कुर्टीतील प्रभाग क्रमांक अकरामध्ये पंचायतीच्या मालकीची जमीन बेकायदा हडप करून बांधलेली दुकाने तसेच निवासी खोल्या, भंगारअड्डा आज शुक्रवारी पंचायतीच्या एका धडक कारवाईत पाडण्यात आला. या बेकायदा बांधकामांवर पंचायतीने बुलडोझर फिरवल्यामुळे पंचायत क्षेत्रात रस्त्याच्या कडेला व इतर ठिकाणी अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

कुर्टी - खांडेपार पंचायतीच्या मालकीच्या बाराशे चौरस मीटर जमिनीत हे बांधकाम करण्यात आले होते. उंडिर - बांदोडा येथील दामोदर नाईक याने ही जमीन बळकावून त्यावर निवासी खोल्या तसेच दुकाने उभी केली होती व भाड्याने दिली होती. मात्र, पंचायतीला कोणताच महसूल मिळत नव्हता.

याप्रकरणी गेल्या २०१२ पासून न्यायालयीन लढा सुरू होता. कुर्टी - खांडेपार पंचायतीने या बेकायदा अतिक्रमणाविरुद्ध अतिरिक्त पंचायत संचालनालयात खटला दाखल केला होता, त्यावर सुनावणी होऊन पंचायतीच्या बाजूने निकाल लागला आणि निर्धारित वेळेत बेकायदा बांधकामे पाडण्याचा आदेश देण्यात आला होता.

कुर्टी - खांडेपार पंचायतीचे सरपंच नीळकंठ नाईक, पंचायत सचिव सचिन नाईक तसेच पंच सदस्य भिका केरकर व इतर पंच सदस्यांनी पुढाकार घेऊन ही बेकायदा अतिक्रमणे हटवली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT