Illegal Casino in Goa Dainik Gomantak
गोवा

Illegal Casino: तिसवाडी तालुक्यात घरांमध्ये चालतोय अवैध कॅसिनो! अमित पालेकरांचा सरकारवर निशाणा

राज्याला अवैध धंद्यानी विळखा घातला आहे.

Kavya Powar

Illegal Casino in Goa: राज्याला अवैध धंद्यानी विळखा घातला आहे. यातच राज्य सरकार याकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे राज्य संयोजक ॲड. अमित पालेकर यांनी केला आहे.

सध्या तिसवाडी तालुक्यात अनेक ठिकाणी अवैध कॅसिनो सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. यावरून पालेकर यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

तिसवाडी तालुक्यात अनेक ठिकाणी घर, फ्लॅट किंवा बंगल्यांमध्ये अवैधरित्या कॅसिनो सुरू आहेत. यावर गुन्हे शाखेने कारवाई करणे गरजेचे आहे. मात्र सर्वजण राजकारण करण्यात व्यस्त आहेत. हे कॅसिनो एक संघटित टोळी चालवत असल्याचे समोर आले आहे.

या अवैध कॅसिनोमध्ये गोव्यातील अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. तरीही सरकारचे याकडे लक्ष का नाही? असा सवाल अमित पालेकर यांनी केला आहे.

दरम्यान, राज्यातील किनारपट्टी परिसरातील ड्रग्ज व्यवसायातील दलाल तसेच विक्रेते हे आता तिसवाडीतील ताळगाव, मेरशी, चिंबल व सांताक्रुझ या परिसरापर्यंत पोहोचले आहेत. ताळगावातील युवा पिढी या ड्रग्जच्या आहारी जात आहे.

या ड्रग्जचा फैलाव या परिसरात करण्यामध्ये एका राजकारण्याशी जवळीक तसेच गुन्हेगारीची पार्श्‍वभूमी असलेल्या एका समाजकंटकाचा हात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: गोवा विधानसभेचा 'खेळखंडोबा'! सत्ताधारी-विरोधकांच्या राजकारणात राज्याच्या भवितव्याचा विसर

Dabolim Dubai Flight: दाबोळी-दुबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार, दररोज एक उड्डाण; मुंबई-गोवा मार्गावरही दिवसाला 8 फेऱ्या

Goa Tourist Death: आठ महिन्यांत गोव्यात 56 पर्यटकांचा मृत्यू! 4 पर्यटकांचे खून; 14 जणांचा बुडून मृत्यू, तर 10 जणांची आत्महत्या

DJ चा आवाज, लग्नाचा जल्लोष अन् अचानक आगीचे भयानक लोट! रिसेप्शन पार्टीत 22 जणांचा होरपळून मृत्यू, थरकाप उडवणारा Watch Video

Goa Politics: '2027 मध्ये 30 आमदार निवडून आणू'; वाढदिवसानिमित्त दामू नाईकांचा निर्धार

SCROLL FOR NEXT