Rohan Khaunte Dainik Gomantak
गोवा

Rohan Khaunte: कळंगुटमध्ये अवैध धंदे सुरूच... खुद्द पर्यटन मंत्र्यांनीच केले मान्य

स्थानिक पोलिस निरीक्षकांना जाब विचारला पाहिजे

गोमंतक ऑनलाईन टीम

Rohan Khaunte: गोव्यातील किनारी भागात अवैध धंदे सुरू असल्याचे आता खुद्द राज्याचे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनीच मान्य केले आहे. कळंगुट येथे मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत. येथे अवैध वेश्याव्यवसायदेखील सुरू आहे. या प्रकरणी स्थानिक पोलिसांना जाब विचारला पाहिजे, असे खंवटे यांनी म्हटले आहे.

काही दिवसांपुर्वीच कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी कळंगुट परिसरातील रेस्टॉरंट, हॉटेलमध्ये खंडणी मागितली जात असल्याचे म्हटले होते. खुद्द त्यांच्याच हॉटेलमध्ये खंडणी मागितली गेल्यावर त्यांनी याविषयी आवाज उठवला होता. दरम्यान, त्यानंतर त्यांनी खंडणी प्रकरण आता मिटले आहे, असेही म्हटले होते.

शिवाय कळंगुट-बागा या किनारी भागात इतरही अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत होत्या. त्या पार्श्वभुमीवर आता खुद्द पर्यटन मंत्र्यांनीच याला दुजोरा दिला आहे.

कळंगुट भागात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत, याबद्दल तेथील स्थानिक पोलिस निरीक्षकांना जाब विचारला पाहिजे, असे मंत्री खंवटे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मंत्री खंवटे हे भाजपचे आमदार आहेत. सध्या राज्यात भाजपचे सरकार आहे. तसेच कळंगुटचे आमदार मायकल लोबोदेखील भाजपचे आहेत. त्यामुळे भाजपच्या मंत्र्यांनीच भाजप आमदारच्या मतदारसंघातील गैरप्रकारांबाबत दुजोरा दिल्याने राजकीय वर्तुळात त्याची चर्चा होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT