Crime News  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: फर्मागुढीत आयआयटीच्या विद्यार्थ्याला मारहाण; तिघेजण फोंडा पोलिसांच्या ताब्यात

तिघेही अल्पवयीन असल्याचा दावा या नातेवाईकांनी केला आहे.

दैनिक गोमन्तक

फर्मागुढी अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरात गुंडागर्दी वाढत असून काल संध्याकाळी आयआयटीच्या एका विद्यार्थ्याला मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांना फोंडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र तिघेही अल्पवयीन असल्याचा दावा या नातेवाईकांनी केला आहे.

काल संध्याकाळी तिघेजण वाहनासह फर्मागुढी परिसरात गेले असता आयआयटीचा विद्यार्थी सुधांशू पांडे याने त्यांना हटकले. त्यामुळे राग आलेल्या तिघांनी सुधांशूला मारहाण करायला सुरवात केली. दारूची बाटली सुधांशूच्या डोक्यावर मारली.

सुधांशूला जबरदस्तीने गाडीत टाकून त्याच्याकडील पैसे काढून घेण्याचा प्रयत्न आणि तेथूनच पळ काढला. जखमी सुधांशूला फोंडा आयडी उपजिल्हा इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती सुधारली असल्याची माहिती देण्यात आली. फोंडा पोलिसांनी तिन्ही संशयिताना ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Election Commission: निवडणूक आयोग घेणार सज्जतेचा आढावा, विशेष बैठका घेणार; 7 ते 8 ऑक्टोबर दरम्यान गोवा दौरा

Sanjivani Sugar Factory: साखरेसोबतच इथेनॉल निर्मितीचेही पूर्ण स्वातंत्र्य! खासगी एजन्‍सीला 'संजीवनी'चे पीपीपी तत्त्वावर 30 वर्षांचे कंत्राट

Goa Health Checkup: राज्यातील तपासणी शिबिरांत 20 जणांना कर्करोगाचे निदान, साडेपाच हजार जणांची आरोग्य तपासणी

Griha Aadhar Scheme: विधानसभा निवडणुकीपूर्वीच 'गृहआधार' मानधनात होणार वाढ, डिचाेलीतील नारी शक्ती महोत्सवात CM प्रमोद सावंतांची घोषणा

Horoscope: रविवारचे राशीभविष्य: सूर्यदेवाच्या कृपेने 'या' 3 भाग्यशाली राशींना मिळणार आनंदाची बातमी, धनलाभासह प्रगतीचे योग

SCROLL FOR NEXT