Ignore burst aqueduct in Sanguem Dainik Gomantak
गोवा

सांगेत फुटलेल्या जलवाहिनीकडे दुर्लक्ष!

पाणी खाते सुस्त: सांगेत जलवाहिनी फुटली; तोडगा काढण्यात चालढकलपणा

दैनिक गोमन्तक

सांगे: सार्वजनिक बांधकाम खात्याचा पाणी विभाग म्हणतो पाणी वाचवा, पण एकदा फुटलेली जलवाहिनी दुरुस्ती करतो म्हणेपर्यंत लाखो लिटर पाण्याची नासाडी होऊन वाया जात असते. जोपर्यत नागरिक आवाज काढत नाहीत, तोपर्यंत फुटलेली जलवाहिनी सताड वाहत असते. पांगुणा - सांगे येथील कपेलसमोर पाणी खात्याची जवाहिनी फुटून पाणी वाया जाण्याचा प्रकार वारंवार घडत असून पाणी खाते मात्र यावर तोडगा काढण्यासाठी चालढकल करीत आहे.

पांगुणा - सांगे येथील जलवाहिनीजळ वीज खांब आहे. जलवाहिनी दुरुस्ती करण्यासाठी हात घातल्यास विजेचा धक्का बसत असल्यामुळे कर्मचारी काम करण्यास तयार नाहीत. आणी ते योग्यही आहे. यापूर्वी त्याच ठिकाणी जलवाहिनी फुटून पाणी वाया जात होते, त्याला ठिगळे जोडण्यात आली, पण आता इतके पाणी वाया जात आहे, की पाहणाऱ्यास नैसर्गिक झर वाटावी अशेच दृश्य आहे. जलवाहिनी आणि वीज खांब यात वीतभर अंतर असल्यामुळे पाणी वीज खांबाच्या मुळाशी साचून झरीप्रमाणे वाहत असल्याने पाणी खात्याचे कर्मचारी दुरुस्ती करण्यास गेल्यास त्यांना तेथे विजेचा धक्का बसत असल्याचा अनुभव आला आहे. परिणामी फुटलेल्या जलवाहिनेचे काम न केल्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून अव्याहतपणे पाणी वाया जात आहे.

यासंदर्भात स्थानिक नगरसेवक मेशु डिकॉस्ता यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मी फुटलेल्या जलवाहिनीविषयी अनेकवेळा पाणी खात्याशी संपर्क साधला असता वीज खांबामुळे जलवाहिनी दुरुस्ती करण्यास अडथळा निर्माण होत आहे. शिवाय खांबही निकामी झाला असल्याने तो बदलण्यात येणार आहे, पण वीज खात्याकडे खांब उपलब्ध नसल्यामुळे काम हाती घेणे शक्य नाही. खांब उपलब्ध होताच जलवाहिनीला अडचण निर्माण होणारा खांब बदलणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT