IFFI Goa 2025 Dainik Gomantak
गोवा

IFFI Goa 2025: पणजीत आजपासून 'इफ्‍फी'तरंग, उद्‌घाटन सोहळ्याला 'पास'ची गरज नाही

IFFI Goa: राज्‍यात कायमस्‍वरुपी मुक्‍काम ठोकलेल्‍या ५६ व्‍या आंतरराष्‍ट्रीय चित्रपट महोत्‍सवास (इफ्‍फी) गुरुवारपासून सुरवात होणार आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: राज्‍यात कायमस्‍वरुपी मुक्‍काम ठोकलेल्‍या ५६ व्‍या आंतरराष्‍ट्रीय चित्रपट महोत्‍सवास (इफ्‍फी) गुरुवारपासून सुरवात होणार आहे.

मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय माहिती आणि प्रसिद्धी मंत्री अश्विनी वैष्‍णव आणि राज्‍यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांच्‍या उपस्‍थितीत पणजीतील जुन्‍या गोमेकॉ इमारतीसमोर सायंकाळी ४ वाजता भव्‍य समारंभात इफ्‍फीचे उद्‍घाटन करण्‍यात येणार आहे. २९ नोव्‍हेंबरपर्यंत हा महोत्‍सव सुरू राहणार आहे.

दरवर्षी इफ्‍फीचे उद्‍घाटन बांबोळी येथील डॉ. श्‍‍यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्‍टेडियमवर होत होते. परंतु, यंदा आयोजकांच्‍या विनंतीनुसार उद्‍घाटन समारंभ पणजीतील जुन्‍या गोमेकॉ इमारतीसमोर आयोजित करण्‍याचा निर्णय राज्‍य सरकारने घेतला आहे.

या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण चित्ररथांची मिरवणूक असणार आहे. एकूण २३ चित्ररथ यात सहभागी होणार असून, त्‍यात गोमंतकीय कलाकारांचे आणि गोव्याच्या संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या ११ आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्‍या (एनएफडीसी) १२ चित्ररथांचा समावेश असणार आहे.

यंदा होणाऱ्या या महोत्सवात रश्मिका मंदाना, साइ पल्लवी, रमेश सिप्पी, किरण सिप्पी, विधू विनोद चोप्रा, अनुपम खेर, बॉबी देओल, खुशबू सुंदर आणि सुहासिनी मणिरत्नम यांच्यासारखे दिग्गज कलाकार सहभागी होणार आहेत.

महोत्‍सवाचा समारोप डॉ. श्‍‍यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्‍टेडियमवर होणार असून, त्‍यात ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना ‘जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. या सोहळ्याला प्रसिद्ध अभिनेते आमिर खानही उपस्थित असतील अशी माहिती आयोजकांनी दिली.

चित्ररथाचे आकर्षण

जुन्‍या गोमेकॉ इमारतीसमोर होणाऱ्या यंदाच्या उद्‌घाटन सोहळ्यासाठी ‘पास’ ची गरज नाही. अनेकांनी पासबाबत विचारणा केली मात्र आम्ही हा सोहळा सर्वांसाठी खुला ठेवला आहे. सोहळ्याच्या ठिकाणी थेट यावे. उद्‌घाटन सोहळ्यात गोमंतकीय कला, संस्कृती दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. देशविदेशातील सिनेसृष्टीतील लोक गोव्यात येत असल्याने त्यांना आपल्या संस्कृतीचा अभ्यास व्हावा, हा मागचा उद्देश असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यंदाच्या इफ्फीची वैशिष्ट्ये

यंदा ८४ देशांचे २७० चित्रपट दाखवण्यात येतील.

‘दी ब्ल्यू ट्रेल’ या ब्राझिलियन चित्रपटाने होणार महोत्सवाची सुरुवात

आंतरराष्ट्रीय विभागात १६० चित्रपट, २१ ऑस्कर नामांकित

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Delhi Blast: "दिल्लीतील स्फोट आम्हीच केला..." पाकिस्तानी नेत्याची जाहीर कबुली Watch Video

Goa Metro: गोव्यात 'मेट्रो सेवा' सुरू करा! केंद्रीय मंत्र्यांची सूचना; हैदराबाद येथील बैठकीत सविस्तर चर्चा

Sanguem: जुन्‍या पुलावर टँकर अडकताच नव्‍या पुलाचे 'धाडसी उद्‌घाटन', वाहतूक कोंडीमुळे चालकांचा सुटला संयम; सांगेतील प्रकार

Canacona: युवा पिढीसाठी गोकर्ण पर्तगाळी मठात ॲम्‍फी थिएटर, युवकांना करणार आकर्षित; 25 नोव्हेंबरपर्यंत सर्व कामांची पूर्तता

Baina Vasco Robbery Case: बायणा प्रकरणात दरोडेखोरांना फ्लॅटची इत्थंभूत माहिती कशी? मागच्या वाटेने, लिफ्टने, थेट नायक यांच्‍याच बेडरूमपर्यंत गेलेच कसे?

SCROLL FOR NEXT