IFFI Opening Ceremony Dainik Gomantak
गोवा

IFFI Opening Ceremony: शाहिद, माधुरी, करण जोहर, सनी देओल; इफ्फीच्या ओपनिंगला कलाकारांची मांदीयाळी

उद्घाटन समारंभात माधुरी दीक्षित नृत्य सादर करणार असल्याने त्याचा आस्वाद घेणार असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.

Pramod Yadav

IFFI Opening Ceremony: गोव्यात आयोजित भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन समारंभ बाम्बोळी येथील श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये होत आहे. 54 व्या इफ्फीच्या महोत्सवाला बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली आहे.

यात प्रामुख्याने शाहिद कपूर आणि माधुरी दीक्षित हजेरी लावली असून, दोघेही उद्घाटन समारंभात नृत्य देखील सादर करणार आहेत. यासह करण जोहर आणि सनी देओल देखील सोहळ्यासाठी हजेरी लावणार आहेत.

उद्घाटन समारंभात शाहिद आणि माधुरी यांच्यासह श्रिया सरन, नुसरत भरुचा, पंकज त्रिपाठी आणि शंतनू मोईत्रा, श्रेया घोषाल आणि सुखविंदर सिंग यासारख्या संगीतकारांसह इतर तारे हजेरी लावणार आहेत.

या सोहळ्यासाठी अभिनेता आणि निवेदक अपारशक्ती खुराना आणि करिश्मा तन्ना देखील उपस्थित राहणार आहेत. सनी देओल पहिल्यांदाच या सोहळ्यासाठी हजेरी लावत असून, त्यांच्या गदर सिनेमाने धुमाकूळ घातला होता. तर, करण जोहर उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन करणार असल्याचे सांगितले जात आहे.

याशिवाय विविध भाषेतील अनेक सिने कलाकार, दिग्दर्शक, लेखक आणि चित्रपट प्रेमी उद्घाटन समारंभाला हजेरी लावणार आहेत.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रेड कार्पेटवर हजेरी लावली यावेळी त्यांनी राज्यात आयोजित चित्रपट महोत्सवाला वीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. तसेच, उद्घाटन समारंभात माधुरी दीक्षित नृत्य सादर करणार असल्याने त्याचा आस्वाद घेणार असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT