Sonu Nigam, Anuradha Paudwal  X
गोवा

Sonu Nigam At IFFI: 'आसमान से आया फरिश्ता..'; सोनू-अनुराधाची रफींना आदरांजली, रसिक मंत्रमुग्ध

Sonu Nigam and Anuradha Paudwal pay tribute to Rafi: प्रख्यात गायक मोहम्मद रफी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित ‘आसमान से आया फरिश्ता: मोहम्मद रफी - द किंग ऑफ मेलडी’ या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी त्यांची अनेक सरस गाणी सादर करून रसिकांची मने जिंकली.

गोमन्तक डिजिटल टीम

Mohammed Rafi The King of Melody Sonu Nigam Performance

पणजी: प्रख्यात गायक मोहम्मद रफी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित ‘आसमान से आया फरिश्ता: मोहम्मद रफी - द किंग ऑफ मेलडी’ या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी त्यांची अनेक सरस गाणी सादर करून रसिकांची मने जिंकली.

रफी यांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या या कार्यक्रमात त्यांच्या गाण्याची शैली आणि त्यांचा गीताकडे पाहण्याचा दृष्टिकोन सोनू निगम यांनी आपल्या गायकीने रसिकांना उलगडून दाखविला.

यावेळी रफी यांचे पुत्र तथा गायक शाहीद रफी, सोनू निगम, अनुराधा पौडवाल आणि दिग्दर्शक सुभाष घई यांच्यासह ‘शताब्दी विशेष: आसमान से आया फरिश्ता मोहम्मद रफी - गायकीचा राजा’ या विषयावर उपस्थितांनी चर्चासत्रात भाग घेऊन रफींच्या आठवणींना उजाळा दिला.

प्रसिद्ध अभिनेत्री शर्मिला टागोर यादेखील यावेळी सभागृहात उपस्थित होत्या. त्यांनाही लगेच प्रेक्षकांतून व्यासपीठावर बोलाविले. चर्चासत्रातील प्रत्येकाने आपले अनुभव आणि रफी यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या.

गोवा

इफ्फीत भावूक क्षण

या कार्यक्रमात अनुराधा पौडवाल, सोनू निगम यांनी मोहम्मद रफी यांनी गायलेली गाणी सादर सादर करून संगीत मैफलीत ‘चार चांद’ लावले. सोनू निगम यांनी गायिलेली ''दर्दे दिल दर्दे जिगर'', ''आसमान से आया फरिश्ता'' आणि ''आवाज दे के'' या गाण्यांनी रसिकांना भावूक केले. कार्यक्रमाचा समारोप ''सौ साल पहले'' या गाण्याने केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT