यंदा इफ्फित  Dainik Gomantak
गोवा

यंदा इफ्फित व्हिडीओ स्ट्रीमिंग सेवांना महोत्सवासाठी आमंत्रित

इफ्फीच्या इतिहासात प्रथमच नेटफ्लिक्स, ॲमेझॉन, झी 5 आणि व्हायाकॉम यासारखे प्रमुख ओटीटी प्लॅटफॉर्म्स बातम्या, मास्टरक्लास व इतर कार्यक्रमांतून सहभागी होत आहेत.

दैनिक गोमन्तक

आशियातील सर्वात जुना आणि भारतातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इफ्फीने, त्याच्या पाच दशकांहून अधिक प्रवासात यंदा प्रथमच, व्हिडीओ स्ट्रीमिंग सेवांना महोत्सवासाठी आमंत्रित केले आहे. अमॅझोन प्राइम व्हिडीओने या इफ्फी त त्यांच्या असणाऱ्या सिनेमा आणि इतर उपक्रमांच्या लाईनअपचे अनावरण केले. यामध्ये त्यांच्या ‘छोरी’ या भयपटाचा जागतिक प्रीमियर, विविध मास्टर क्लासेस आणि देशातल्या सर्जनशील लोकांशी होणाऱ्या परिसंवादांचा समावेश आहे. इफ्फी आणि ओटीटी प्लॅट्फॉर्मचा हा सहयोग सिनेमा कलेतील उत्कृष्टतेला चालना देण्याच्या समान उद्दिष्टांना पाठबळ देईल.

व्हिडीओ स्ट्रीमिंगमधील उल्लेखनीय वाढ, ग्राहकांच्या मनोरंजनाच्या गरजा पूर्ण करण्यात त्याची वाढती भूमिका यामुळे सर्जनशील अर्थव्यवस्थेच्या एकूण वाढीला चालना मिळाली आहे. गेल्या पाच वर्षांत भारतात मनोरंजनाच्या क्षेत्रात घेतलेल्या काही पावलांमुळे, ओटीटी प्लॅट्फॉर्म आज सर्व भाषांमधील काही उत्तम कथा आणि कथाकारांचे घर बनले आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये, ओटीटी प्लॅट्फॉर्मनी स्थानिक भाषेतील कथांना व्यापक व्यासपीठ देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि त्यामुळे भाषिक आणि भौगोलिक सीमा हटून 240 हून अधिक देश आणि प्रांतांमध्ये आंतरराष्ट्रीय पोच असलेल्या ओटीटी प्लॅटफॉर्मनी उत्कृष्ट भारतीय स्थानिक, अस्सल कथांना जागतिक स्तरावर नेण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT