LOP Yuri Alemao And CM Dr. Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

'गोवा महाराष्ट्राचा भाग असता तर CM सावंत एखाद्या गावचे सरपंच असते'; विरोधी पक्षनेते आलेमाव यांची खोचक टीका

Goa Assembly Monsoon Session 2024: विरोधीपक्षनेते युरी आलेमाव यांनी ओपिनियन पोल दिन साजरा करण्याबाबत खासगी ठराव मांडला आहे.

Pramod Yadav

ओपिनियन पोल (जनमत कौल) दिवशी गोवा महाराष्ट्रात विलीन झाला असता तर राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आज एखाद्या गावचे सरपंच असते, अशी खोचक टीका विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे.

ओपिनियन पोल दिवस अस्मिताय दिस म्हणून राज्यपातळीवर साजरा करावा, या मागणीसाठी आलेमाव यांनी खाजगी सदस्य ठराव मांडला आहे. यावरुन प्रतिक्रिया देताना आलेमाव यांनी सावंत यांना डिवचण्याचा प्रयत्न केला.

गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी विरोधीपक्षनेते युरी आलेमाव यांनी ओपिनियन पोल दिन साजरा करण्याबाबत खासगी ठराव मांडला आहे.

'ओपिनियन पोल दिन हा एक महत्त्वाचा दिवस आहे. त्या दिवशी गोमंतकीयांनी गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरणाच्या विरोधात मतदान केले. हा दिवस 'अस्मिताय दिस' म्हणून राज्यपातळीवर साजरा करणे आवश्यक आहे. त्यावर मी खाजगी सदस्य ठराव मांडला आहे आणि मला आशा आहे की सर्व आमदार या ठरावाला पाठिंबा देतील', असे आलेमाव यांनी म्हटले आहे.

गोवा महाराष्ट्रात विलीन झाला असता तर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आज एखाद्या गावचे सरपंच असते, अशी खोचक टीका आलेमाव यांनी केली. युरी आलेमाव यांनी १६ जानेवारी हा दिवस राज्यपातळीवर 'अस्मिताय दिस' म्हणून साजरा करण्याची मागणी केलीय.

16 जानेवारी 1967 हा दिवस गोव्याच्या इतिहासात अतिशय महत्त्वाचा मानला जातो. कारण याच दिवशी गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण व्हावे का गोवा केंद्रशासित प्रदेश व्हावा, यावर जनमत कौल झाला होता.

राज्यातील एकूण 3,88,432 मतदारांपैकी 3,17,633 म्हणजे 81 टक्के लोकांनी मतदान केले. मतमोजणी तीन दिवस चालली. पहिल्या दिवशीच्या शेवटी विलीनीकरणाच्या बाजूने पारडे झुकले परंतु त्यानंतर चित्र वेगळे झाले.

विलीनीकरणाच्या विरोधात 1,72,191 मते तर बाजूने 1,38,170 मते पडली. 54 टक्के मते पडल्यामुळे गोवा हा स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश राहील या वर जनमताचं शिक्कामोर्तब झालं. त्यानंतर मूळ स्वतंत्र राज्याची जॅक सिक्वेरा यांची मागणी पूर्ण व्हायला 1987 साल उजाडावे लागले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT