Amit Patkar Dainik Gomantak
गोवा

Goa Congress : काँग्रेस सत्तेत आल्यास 30 लाख नोकर भरती

Goa Congress : पाटकर; राहुलच्या आश्‍वासनाची दिली माहिती

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Congress :

पणजी, आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाची सत्ता आल्यास देशभरातील तरुणांसाठी ३० लाख कायमस्वरूपी सरकारी नोकऱ्या देण्याचे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले आहे.

केंद्रातील भाजप सरकार आपल्या दोन कार्यकाळात केवळ रोजगार निर्मितीचे आश्‍वासन देत होते, परंतु त्यांनी दिलेल्या आश्‍वासनाएवढ्याही नोकऱ्या ते तयार करू शकले नाहीत, असे मत प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी व्यक्त केले. याप्रसंगी दक्षिण गोवा खासदार फ्रान्सिस सार्दिन, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि केपेचे आमदार एल्टन डिकोस्ता आदी उपस्थित होते.

पाटकर म्हणाले, भारत जोडो न्याय यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आदिवासीबहुल राजस्थानमधील बांसवाडा भागात पोहोचल्यानंतर युवकांना वरील आश्‍वासन दिल्याचे स्पष्ट केले.

केंद्र सरकारच्या विविध खात्यांमधील रिक्त पदे भरून आमच्या बेरोजगार तरुणांना मदत करण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध आहे. केंद्रीय मंत्रालये आणि विभागांमध्ये दहा लाख मंजूर पदे रिक्त असल्याचे त्यांनी सांगितले.

सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीसोबत ॲप्रेन्टिशीप काँग्रेस सत्तेत आल्यावर सुरू करेल, भरती पेपर लिक प्रकरणावर अंकुश आणला जाईल. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशमधील पोलिस पेपर लिक प्रकरणाचा दाखलाही दिला. ॲप्रेन्टिशीप करणाऱ्या युवकाला वर्षाला एक लाख रुपये मिळतील, अशा प्रकारे पाटकर यांनी राहुल यांच्या योजनांची माहिती दिली

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT