ID Hospital Ponda  Dainik Gomantak
गोवा

ID Hospital Ponda : फोंडा आयडी इस्पितळात रुग्णांची परवड; सातपैकी पाच लिफ्ट बंद

ID Hospital Ponda : सर्जनचा पत्ताच नाही, आरोग्य खात्याचे दुर्लक्ष

गोमन्तक डिजिटल टीम

ID Hospital Ponda : फोंडा तालुक्यासह लगतच्या तालुक्यातील गावातील रुग्णांना वरदान ठरलेल्या आयडी उपजिल्हा इस्पितळातील समस्यांमुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांनाही त्रासाला आणि अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

या इस्पितळातील सातपैकी पाच लिफ्ट सध्या बंद असून रुग्णांना जिने चढून तपासणीसाठी जावे लागत आहे. तर या इस्पितळात आरोग्य खात्याने अद्याप सर्जन पाठवला नसल्याने रुग्णांना मडगावच्या हॉस्पिसियो किंवा ‘गोमेकॉ’ इस्पितळात धाव घ्यावी लागत आहे.

फोंड्यातील आयडी उपजिल्हा इस्पितळ अद्ययावत स्वरुपात खुले झाले असले तरी या इस्पितळाकडे आरोग्य खात्याचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने रुग्णांची परवड होत आहे. इस्पितळातील सर्जनची जागा रिकामी आहे, मात्र नवीन सर्जन अद्याप आरोग्य खात्याने दिला नसल्याने रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी इतर इस्पितळात धाव घ्यावी लागत आहे.

फोंडा आयडी उपजिल्हा इस्पितळातील लिफ्ट बंदच राहत असल्याने रुग्णांना अतिशय त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे ही लिफ्टसेवा आधी व्यवस्थित करा आणि रुग्णांचे हाल वाचवा.

- जयराम नाईक, ढवळी - फोंडा

या इस्पितळात नवनवीन सुविधा आता उपलब्ध करणे गरजेचे आहे, मात्र लिफ्ट बंद सारखी समस्या उद्भवत असल्याने सरकारने त्याकडे आधी लक्ष देऊन रुग्णांची सोय करायला हवी.

- रामदास तु. हळदणकर, शांतीनगर - फोंडा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT