Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa News: 'त्या' प्रलंबित प्रश्नी मी खोर्ली आणि भोमा ग्रामस्थांच्या पाठीशी- श्रीपाद नाईक

आपण खोर्ली आणि भोमा ग्रामस्थांच्या पाठीशी- श्रीपाद नाईक

गोमन्तक डिजिटल टीम

राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आपण भोमा आणि खोर्ली येथील ‘राष्ट्रीय हमरस्ता'प्रश्नी खोर्ली आणि भोमा ग्रामस्थांच्या पाठीशी असल्याचे सांगितले आहे. रस्त्यासाठी शेजारच्या पडीक शेतातून बायपास करण्यासाठी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहिले असून या संबंधी गडकरी यांनी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे.

दरम्यान याआधी भोमा आणि खोर्ली येथील ‘राष्ट्रीय हमारस्ता 4-अ’चा विस्तार करून लोकांची घरे आणि गावातील मंदिरे पाडण्याऐवजी बगलमार्गाचा पर्याय वापरा अशी मागणी करणारे पत्र गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी गोव्याचे मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल यांना पाठविले होते.

गावात विकास करताना स्थानिकांना विश्वासात घेऊन करायचा असतो. तो त्यांच्यावर थोपवायचा नसतो. लोकांनी सरकारला बगलमार्गाचा पर्याय सुचविला आहे. हा पर्याय कमी खर्चिक आहे. तरीही सरकार आपल्याच म्हणण्यावर का अडून बसले आहे ते कळत नाही, असे सरदेसाई यांनी म्हटले होते.

याचसंबंधी आता राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आपण खोर्ली आणि भोमा ग्रामस्थांच्या पाठीशी असल्याचे सांगितले आहे. यासाठी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहिले असून या प्रश्नी गडकरी यांनी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT