MLA Carlos Ferreira Dainik Gomantak
गोवा

पंच सदस्यांऐवजी मी मतदारांवरच विसंबून : आमदार ॲड. फेरेरा

मतदारांशी माझा थेट संबंध असल्याने मी त्यांच्यावरच विसंबून आहे व त्यांच्यावरच माझा विश्वास आहे, असे हळदोणेचे आमदार ॲड. कार्लुस फरेरा यांनी पत्रकारांशी बोलताना आज रविवारी स्पष्ट केले.

दैनिक गोमन्तक

म्हापसा : विकासकामांना चालना देताना मी मतदारसंघातील पंचायत मंडळांवर अथवा पंचायतसदस्यांवर मी अवलंबून नाही. मतदारांशी माझा थेट संबंध असल्याने मी त्यांच्यावरच विसंबून आहे व त्यांच्यावरच माझा विश्वास आहे, असे हळदोणेचे आमदार ॲड. कार्लुस फरेरा यांनी पत्रकारांशी बोलताना आज रविवारी स्पष्ट केले.

आमदार फरेरा म्हणाले, मतदारांशी थेट संबंध ठेवण्यावरच भर देऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन सोवण्याच्या दृष्टीने मी प्रयत्नशील आहे. असे करण्यातच मी समाधान मानतो. विधानसभा निवडणुकीवेळी मला पाठिंबा देणाऱ्या पंचायत सदस्यांची संख्या विरोधक उमेदवारांपेक्षा खूपच कमी होती; परंतु तरीसुद्धा मतदारांशी स्नेहसंबंध ठेवल्यानेच मी आमदारपदी निवडून येऊ शकलो, असेही त्यांनी सांगितले.

पंचायत निवडणुका पुढे ढकलण्याच्या विषयासंदर्भात आपले मत काय, असे विचारले असता ॲड. फेरेरा म्हणाले, या विषयावर मतप्रदर्शन करून मला त्या वादात पडायचे नाही. कारण तो कायदेशीर तथा राजकीय मुद्दा आहे. या निवडणुका आता लवकरच घेतल्या आणि पुढे ढकलल्या तरीसुद्धा आमची पूर्ण तयारी आहे. पंचायत निवडणुका कधीही झाल्या तरी आम्हाला कोणताही फरक पडणार नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT