Utpal Parrikar Latest News Updates Dainik Gomantak
गोवा

Goa Utpal Parrikar: मला पदाची भूक नाही; माझा लढा तत्वांसाठी

आता सर्व काही गोव्यातील जनतेच्या हातात असून जनता जो निर्णय देईल तो आपल्याला मान्य असल्याचे मत उत्पल पर्रीकर यांनी व्यक्त केले आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Utpal Parrikar: स्व. मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी स्वत:च्या पक्षाने उमेदवारी नाकारल्यामुळे भाजपला राजीनामा दिला आहे. या पार्श्वभूमीवर आपला राजकीय अजेंडा जाहीर करण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यात त्यांनी विधानसभा निवडणूक (Goa Assembly Elections 2022) स्वतंत्रपणे लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

यावेळी अपक्ष निवडणूक लढवण्यामागचे कारण विचारले असता उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) म्हणाले की, 'मी स्वत:ला माझ्या पक्षासमोर बऱ्याचदा सिद्ध केले आहे. मला पणजीतून (Panaji) निवडणूक लढण्याची इच्छा होती; पण पक्षाने मला उमेदवारी नाकारल्यामुळे माझ्याकडे आता कोणताच पर्याय उरलेला नाही. यादरम्यान दुसऱ्या पक्षांकडून जरी मला प्रस्ताव मिळाला असला, तरी त्यांच्यासोबत जाणे माझ्या तत्वात बसत नाही. त्यामुळे मी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या वडिलांचे गोव्यातील आणि पक्षातील कार्य मोलाचे आहे. मला त्यांचा वारसा पुढे न्यायचा आहे. त्यांची तत्वे अमलात आणायची आहेत. मला कोणत्याही पदाची, अधिकाराची भूक नाही. पण फक्त गोव्यातील जनतेची काळजी आहे. म्हणूनच मी ही निवडणूक स्वतंत्रपणे लढवत आहे.'

भाजप (BJP) पक्षाने उमेदवारी नाकारल्यावर मी दुसऱ्या पक्षात गेलो असतो, पण ही निवडणूक मी माझ्या तत्वांसाठी लढत आहे. मला आमदारकीचा, पदाचा किंवा पैशाचा मोह नाही.शिवाय मला कुणविरुद्धही लढायचे नाही, किंवा शत्रू बनवायचे नाहीत. फक्त जनतेसाठी मला काम करायचे आहे आणि ते मी करणारच', असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. 'मी विजयी होऊ शकत नाही असे पक्षाने सांगितले. पण भाजपच्या पणजी उमेदवाराबद्दल बोलायची पण मला लाज वाटते', अशी खरमरीत टीकाही त्यांनी यावेळी केली. ते पुढे म्हणाले, 'आता जे काही होईल ते सर्व जनतेच्या हातात आहे. माझी राजकीय कारकीर्द मी गोवेकरांच्या (People of Goa) हातात सोपवली आहे. त्यामुळे भलेही जनतेने मला निवडून दिले नाही, तरी मी त्यांच्या निर्णयाचा आदर करेन आणि जनतेच्या हितासाठी नेहमी लढत राहीन.' आता त्यांच्या या भूमिकेला गोवेकर कौल देणार का? ही बाब निवडणुकीतच स्पष्ट होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT