I have no idea about setting up Goa IIT project Deputy CM
I have no idea about setting up Goa IIT project Deputy CM 
गोवा

Goa : आयआयटी प्रकल्प उभारणीबाबत मला कल्पनाच नाही : उपमुख्यमंत्री

दैनिक गोमंतक

मोरजी : तुये येथील आयटी प्रकल्पाच्या शेजारी सरकारने महसूल विभागाकडे आयआयटी (IIT) प्रकल्प  (Project) उभारण्यासाठी  फाईल पाठवलेली आहे, त्या जागेत जर हा प्रकल्प उभा राहिला तर आमदार म्हणून आपण त्याचे स्वागत करतो असे मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांनी सांगितले, तर उपमुख्यमंत्री (Deputy CM) बाबू आजगावकर आपल्याला काही माहीत नसल्याचे सांगितले.

पेडणे तालुक्यातील मांद्रे मतदार संघातील  तुये पंचायत क्षेत्रातील नियोजित आयटी प्रकल्पाजवळ आता सरकारने भारतातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या शैक्षणिक क्षेत्रातील उच्चदर्जाचा आयआयटी प्रकल्प उभारण्यासाठी जागेचा प्रस्ताव महसूल विभागाकडे पाठवलेला आहे.

आयआयटी म्हणजे काय?
आयआयटी म्हणजे भारतीय तंत्रज्ञान संस्था स्वायत्त भारतीय सार्वजनिक अभियांत्रिकी शिक्षण संस्था म्हणून अग्रेसर आहे. ह्या भारत देशामधील स्वायत्त शिक्षण संस्था आहेत. भारत सरकारच्या अखत्यारीत असलेल्या आयआयटी देशातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्था मानल्या जातात. आजच्या घडीला देशात एकूण २३ आयआयटी कार्यरत आहेत. आयआयटीच्या पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी १२वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना जॉइंट एंट्रन्स एक्झॅमिनेशन ही परीक्षा द्यावी लागते. पदव्युत्तर कार्यक्रमात प्रवेश मिळवण्यासाठी उत्सुक विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनियरिंग (गेट) ही परीक्षा द्यावी लागते.

चांगल्या प्रकल्पाचे सदोदित स्वागत करणार
मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांनी याविषयी बोलताना सांगितले की, आपल्या मतदार संघात भारतातील उच्च शैक्षणिक क्षेत्रातील आयआयटी प्रकल्प येत आहे तर आपण त्याचे स्वागत करतो शिक्षण क्षेत्रातील हे क्रांतिकारक पाऊल आहे असे सांगून जागे विषयी हल्लीच प्रस्ताव सरकारने महसूल विभागाकडे पाठवलेला आहे. हा प्रकल्प आला तर आपण त्याचे स्वागत करीन शिवाय जनतेलाही त्याची योग्य ती माहिती देणार असल्याचे सांगितले. अशा चांगल्या प्रकल्पाचे आपण सदोदित आमदार या नात्याने स्वागत करणार असल्याचे सांगितले.

मला काही कल्पना नाही : उपमुख्यमंत्री आजगावकर
या विषयी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्याकडे संपर्क साधला असता कुठे प्रकल्प येतो त्याची काही आपल्याला कल्पना नाही. मात्र कोणताही प्रकल्प आणण्यापूर्वी जनतेला विश्वासात घेऊन आणायला हवा, जसा मोप विमानतळ आणला आणि जनता रस्त्यावर उतरून हा प्रकल्प मार्गी लावला तसा तो करायला हवा. कोणताही प्रकल्प जनतेच्या सहकार्याशिवाय होऊ शकत नाही . कोणतेही प्रकल्प आणण्यापूर्वी अगोदर पाणी पुरवठा प्रश्न सोडवायला हवा. मोप विमानतळासाठी चांदेलचे पाणी देण्याऐवजी तिळारीतून थेट द्यावे, चांदेलचे पाणी जनतेला मिळत नाही त्याबद्दल खंत व्यक्त करून मांद्रे मतदार संघासाठी पाणी प्रकल्प मुख्यमंत्री पार्सेकर असताना उभारायला हवा होता तो उभारला नाही. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोवा निवडणूक काळात केजरीवालांचा सेव्हन स्टार हॉटेलमध्ये मुक्काम, कोणी दिले बिल? ED ची कोर्टात माहिती

Goa Loksabha: दाबोळीत लोकशाहीचा खून, पोलिस संरक्षणात पैसे वाटल्याचा काँग्रेस उमेदवार विरियातोंचा आरोप

Goa Election 2024 Voting: गोव्यातील अनेक चर्चमधून भाजपला मतदान न करण्याचे आवाहन; माजी मंत्र्याचा गंभीर आरोप

Pastor Dominique Dsouza: उत्तर गोव्यातून तडीपार करण्याच्या कलेक्टरच्या आदेशाविरोधात डॉमनिकची कोर्टात धाव

Goa News: कामुर्लीत घराला आग लागल्याने लाखोंचे नुकसान; मोठी दुर्घटना टळली

SCROLL FOR NEXT