Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

नोकरभरतीसाठी फक्त साखळीतील तरुणांना प्राधान्य नाही : मुख्यमंत्री सावंत

काही राजकारण्यांप्रमाणे फक्त माझ्याच मतदारसंघातील लोकांनाच नोकऱ्या देण्याची मला सवय नाही : सावंत

दैनिक गोमन्तक

पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सरकारी खात्यांतील भरतीवरुन मंत्रिमंडळातील सहकार्‍यांवर अप्रत्यक्षपणे टीका केली. सावंत यांनी दावा केला की ते नोकरभरतीसाठी फक्त आपल्या मतदारसंघाला प्राधान्य देत नाहीत.

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या आठ वर्षांच्या कार्यकाळाला उजाळा देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावर अनेक गरजू लोकांना नोकऱ्या मिळाल्या आहेत.

“काही राजकारण्यांप्रमाणे फक्त माझ्याच मतदारसंघातील लोकांनाच नोकऱ्या देण्याची मला सवय नाही. मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावर कायमस्वरूपी पदांवर काम करण्यासाठी 500 हून अधिक लोकांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना लवकरच ऑफर लेटर दिले जातील. आंतरराष्ट्रीय विमानतळावर फक्त साखळीमधील लोकांनाच नोकऱ्या दिल्या जातात असे म्हणणे चुकीचे आहे,” सावंत म्हणाले.

हे विधान आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्यावर टीका करणारे होते, असे अनेक राजकीय विश्लेषकांचे मत आहे कारण राणेंवर फक्त आपल्या मतदारसंघातील तरुणांना गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त जागांवर नोकरी देण्याचा आरोप आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opposition Alliance: जनतेचे ऐका, महाआघाडी करा! दसऱ्यापर्यंत निर्णय घेण्याची सरदेसाईंची काँग्रेसकडे मागणी

खरी कुजबुज: बाबू पुन्हा आक्रमक...

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार थेट 69,000 रूपये होणार? 8व्या वेतन आयोगासमोर 3.833 फिटमेंट फॅक्टरची मागणी

CJP Protest Delhi: आंदोलकांवरील निर्बंधांवर सर्वोच्च न्यायालयाची पोलिसांना चपराक! रस्ते, मेट्रो आणि इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याचे आदेश; प्रशासनाचे दणाणले धाबे

Stray Dogs Beach: समुद्रकिनाऱ्यांवरील भटक्या कुत्र्यांची दहशत मोडून काढणार! पर्यटन खात्याचा 15 ऑक्टोबरचा अल्टीमेटम!

SCROLL FOR NEXT