Goa News Dainik Gomantak
गोवा

Pahalgam Attack: 'मला रात्री झोप येईना', गोव्यातील प्रसिद्ध टीटोजच्या मालकाने गुड फ्रायडेची कमाई पहलगामच्या जखमींना केली दान

Pahalgam Terrorist Attack: पहलगाम येथे झालेल्या अमानवी हल्ल्यानंतर मी व्यवस्थित झोपू शकत नाही, पण या हल्ल्यातील जखमींना मदत करण्याचा आपण आपल्या परीने प्रयत्न करुयात, असे डिसोझा म्हणाले.

Pramod Yadav

पणजी: जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला. तर, अनेकजण जखमी झाले. या हल्ल्याचा जगभरातून निषेध केला जात आहे. देशभरातून याप्रकरणी हळहळ व्यक्त केली जात आहे. गोव्यातून देखील याप्रकरणी निषेध मोर्चा काढण्यात आला. येथील प्रसिद्ध टीटोज क्लबच्या मालकाने पहगाम हल्ल्यातील जखमींसाठी आर्थिक मदतीची घोषणा केली आहे.

टीटोजचे मालक रिचर्ड डिसोझा यांनी पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी गुड फ्रायडेची कमाई दान करण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. डिसोझा यांनी स्वत: याबाबत माहिती दिली आहे. पहलगाम येथे झालेल्या अमानवी हल्ल्यानंतर मी व्यवस्थित झोपू शकत नाही, पण या हल्ल्यातील जखमींना मदत करण्याचा आपण आपल्या परीने प्रयत्न करुयात, असे डिसोझा म्हणाले.

गुड फ्रायडेला होणारी कमाई मी शक्यतो दान करत असतो. यावेळी ही कमाई मी पहलगाम हल्ल्यातील जखमींना दान करण्याचा निर्णय घेतला आहे. डिसोझा यांनी तीन लाख रुपये जखमींसाठी दान करत असल्याची माहिती दिली.

२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर, अनेकजण जखमी झाले. दहशतवाद्यांनी पहगाम येथे आलेल्या पर्यटकांना निशाणा केल्याने भारतासह जगभरातून याप्रकरणी टीका केली जात आहे.

गोव्यात 20 पाकिस्तानी!

गोव्यात एकूण २० पाकिस्तानी नागरिक आहेत. त्यापैकी हंगामी व्हिसावर आलेल्या तिघांना २७ एप्रिलपर्यंत देश सोडण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. दरम्यान. दिर्घ काळाच्या व्हिसावर असलेल्या १७ नागरिकांवर नजर ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tarun Tejpal Case: तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; 3 आठवड्यांत तुरुंगात आत्मसमर्पण करण्याचे आदेश

Goa E20 Petrol: 'ई-20'चा सर्वाधिक फटका गोव्याला? केजरीवालांचा भाजप सरकारवर निशाणा; 40 टक्क्यांहून गोमंतकीयांकडे चारचाकी

Goa Congress: विधानसभा तिकीटासाठी 4 कोटींची बोली? खर्गेंच्या हॉटेल बिलावरूनही ग्रासियस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप

Pakistan AC Blast: पाकिस्तान हादरलं! रुग्णालयात एसी कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट, 15 नवजात बालकांचा आगीत होरपळून मृत्यू; VIDEO

खरी कुजबुज: धो धो आश्वासने!

SCROLL FOR NEXT