Car On Morjim Beach Dainik Gomantak
गोवा

मिरामारनंतर आता मोरजी समुद्रकिनारी कार, तेलंगणाचा चालक पोलिसांच्या ताब्यात

पेडणे पोलिसांनी हैद्राबाद, तेलंगणा येथील कार चालकाला ताब्यात घेतले आहे.

Pramod Yadav

Car On Morjim Beach: नुकतेच मिरामार बीचवर एक कार जाऊन अडकून पडली, पणजी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करत, कार जप्त केली.

दरम्यान, अशीच एक घटना मोरजी समुद्रकिनाऱ्यावर घडली आहे. पेडणे पोलिसांनी हैद्राबाद, तेलंगणा येथील कार चालकाला ताब्यात घेतले आहे.

नरेल्ला सुरेश (वय 38, रा. तेलंगणा) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कार चालकाचे नाव आहे. शिवोली किनारी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पेडणे पोलिसांच्या स्वाधिन केले. त्याच्या ताब्यातील वाहन आंध्रप्रेदश पासिंग (AP 28 At 9916) असलेले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज (शुक्रवारी) सकाळी ही घटना घडली, सुरेश त्याच्या ताब्यातील कार घेऊन मोरजी समुद्रकिनाऱ्यावर वाळूतून फेरफटका मारताना आढळून आला. शिवोली किनारी पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी तात्काळा त्याला थांवबून ताब्यात घेतले. दरम्यान, त्यानंतर कायदेशीर कारवाईसाठी त्याला पेडणे पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे.

राज्यात येणारे काही पर्यटक नियमांचे उल्लंघन करत समुद्रकिनाऱ्यावर बेदरकारपणे वाहन चालवतात किंवा बीचवर वाहन घेऊन जाण्यास बंदी असताना देखील तिथे घेऊन जातात. यामुळे वाहन चालक इतरांचा जीव धोक्यात घाऊन शांतता भंग करतात. प्रशासनाने वारंवार आवाहन केले असताना नियमांचे उल्लंघन करताना दिसतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT