Hyderabad Bus Accident  Twitter / ANI
गोवा

हैदराबाद बस दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची भीती

अपघातानंतर बस पेटल्याने 7 जणांचा होरपळून मृत्यू; 12 जणांची प्रकृती गंभीर

दैनिक गोमन्तक

पणजी : मालवाहतूक ट्रकला धडक दिल्यानंतर खासगी बसने पेट घेतल्याने सात जणांचा होरपळून मृत्यू झाला; तर 16 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी 12 जणांची प्रकृती गंभीर आहे. गुलबर्गा (कर्नाटक) येथून 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या कमलापूर येथे काल शुक्रवारी सकाळी हा भीषण अपघात झाला.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, सकाळी सातच्या सुमारास गोव्याहून हैदराबादकडे निघालेली खासगी बस आणि ट्रक यांच्यात धडक झाली. धडकेने बस पुलावर आदळली आणि तिने अचानक पेट घेतला. त्यामुळे सर्व प्रवाशी बसमध्येच अडकले. प्रवाशांनी आरडाओरडा सुरू केला, पण काही मिनिटांतच संपूर्ण बस जळून खाक झाली. बसमध्ये तेलंगणाचे 35 प्रवासी होते.

अर्जुन (वय 34), सरलादेवी अर्जुन (32), विवान अर्जुन (2 वर्षे), शिवकुमार (35), रावली शिवकुमार (30), दीक्षित शिवकुमार (9 वर्षे) आणि अनिता राजू (40) अशी मृत प्रवाशांची नावे आहेत. ते सर्वजण तेलंगणातील सिकंदराबाद येथील रहिवासी आहेत.

अर्जुन आणि सरलादेवी अर्जुन हे आपल्या कुटुंबातील 30 सदस्य, मित्र आणि शेजाऱ्यांसह आपला मुलगा विवान याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी 29 मे रोजी गोव्यात आले होते आणि 2 जून रोजी संध्याकाळी ते गोव्याहून परतीच्या मार्गावर होते. पण परतताना त्यांच्यावर काळाने झडप घातली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT